सोलापुरातील अनगरनंतर साताऱ्यातही भाजपची कमाल, 5 नगरसेवक बिनविरोध; कोणत्या नगरपरिषदेत मिळवलं वर्चस्व?

Malkapur Nagar parishad : सोलापुरातील अनगरनंतर साताऱ्यातही भाजपची कमाल, 5 नगरसेवक बिनविरोध; कोणत्या नगरपरिषदेत मिळवलं वर्चस्व?

Malkapur Nagar parishad

Malkapur Nagar parishad

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 19 Nov 2025, 09:47 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापुरातील अनगरनंतर साताऱ्यातही भाजपची कमाल

point

5 नगरसेवक बिनविरोध; कोणत्या नगरपरिषदेत मिळवलं वर्चस्व?

मलकापूर, सातारा ; एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे मलकापूर शहर आता राजकीयदृष्ट्या नव्या वळणावर आहे. कराडचे भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का देत नगर परिषद निवडणुकीत महत्त्वाची आघाडी घेतली आहे. मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून स्थानिक राजकारणात याची मोठी चर्चा रंगली आहे.

हे वाचलं का?

काँग्रेसचा गड ढासळला

काही वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेसची मजबूत पकड असलेल्या मलकापूरमध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान प्रत्येक प्रभागात भाजपला थेट विजय मिळाला. विरोधी पक्षांकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने पाचही जागा सहजपणे भाजपच्या खात्यात जमा झाल्या.

बिनविरोध विजयानंतर अभिवादन

बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत विजयाचा मान्यवरांना सलाम केला. मलकापूर नगर परिषदेतील एकूण 22 नगरसेवक पदे आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असताना, पाच जागा बिनविरोध जाणं भाजपसाठी गेम चेंजिंग ठरणार आहे.

हेही वाचा : ऐन वयात येणाऱ्या 16 वर्षांच्या कोमलला तिच्या मामानेच लोकलमधून दिलं ढकलून, नेमकं कारण काय?

अतुल भोसले यांची प्रतिक्रिया

या विजयावर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी समाधान व्यक्त करत म्हटले, “मलकापूर प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पाच उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही मलकापूरकरांची भाजपवरील विश्वासाची पावती आहे. उर्वरित जागा देखील नागरिक आपल्या विचाराने निवडून देतील. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मलकापूरकर आणि कराडचा उमेदवार कराडकर ठरवतील.”

राजकीय समीकरणात मोठा बदल

मलकापूरमधील हा बिनविरोध विजय भाजपला नवीन ऊर्जा देणारा ठरत असून कराड आणि मलकापूर या दोन्ही ठिकाणची राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. उर्वरित 17 जागांसाठी चुरस वाढली असून नगराध्यक्षपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विजयाचा प्रभाव आगामी राजकीय रणनीतीवर होणार हे निश्चित. मलकापूरमध्ये भाजपची वाढती ताकद आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे ढासळलेले बुरुज यामुळे आगामी राजकारणात नवे समीकरण दिसू लागले आहे. मलकापूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. पण आज चित्र उलटं दिसतंय. कराडचे भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का देत ताकद दाखवली आहे. मलकापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

भाजप नेत्याला भिडणारी रणरागिणी… उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज नेमका अचानक कसा झाला बाद?

    follow whatsapp