narendra modi criticism by abhijeet dipke, दिल्ली : शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या 20 व्या दिवशी पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून उचलून रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. जंतर-मंतर येथे आंदोलकांविरोधात दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करत दिपके यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच 20 जुलै रोजी होणारा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणारच असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जर लोक आजही घराबाहेर पडून जंतर-मंतरवर आले नाहीत, तर सोनम वांगचूक यांनी 20 दिवस केलेल्या उपोषणाच्या त्यागाला अर्थ उरणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बांगड्या भरल्या, लिपस्टिक लावली अन् मेकअप.., छेड काढणाऱ्या 'रोमिओ'ला तरुणीने शिकवला धडा VIDEO
'नरेंद्र मोदी हे इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान'
आपण परदेशातून देशात परतलो कारण आपल्याला देशाच्या संविधानावर विश्वास होता, असे दिपके यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपल्याला रोखण्याचा, बदनाम करण्याचा आणि विविध आरोप करण्याचा प्रयत्न होईल, याची कल्पना होती. मात्र संविधान आपल्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींवर अत्यंत कठोर शब्दांत टीका करत त्यांना देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचे म्हटले. शिवाय मोदी हे हुकूमशाह असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुलांवर लाठीचार्ज होत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसत असल्याची टीकाही केली.
हेही वाचा : 'तिनं दुसऱ्यावर प्रेम करावं, हा विचारच मला सहन होत नव्हता..' तरुणीवर कॉलेजमध्येच सपासप वार
आता नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा, अभिजीत दिपकेंची मागणी
यावेळी दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा करत आता नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा, अशी घोषणाही दिली. 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत सरकारने जबाबदारी निश्चित करण्याऐवजी न्यायाची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आले, त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले तसेच आंदोलनातील स्वयंसेवकांनाही मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्याशी शिवीगाळ केल्याचाही दावा त्यांनी आपल्या भाषणात केला.
आपले आंदोलन आतापर्यंत जसे शांततेत सुरू होते तसेच पुढेही सुरू राहील, असे स्पष्ट करत दिपके यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची भूमिका मांडली. 20 जुलैचा संसद मोर्चाही पूर्णपणे शांततापूर्ण असेल, असे त्यांनी सांगितले. तसेच देशातील प्रत्येक जिल्हा, शहर आणि परिसरात शांततेच्या मार्गाने आंदोलन आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले. अशा प्रत्येक आंदोलनाला 'जंतर-मंतर' हे नाव द्यावे आणि तेथे महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सोनम वांगचूक यांचे छायाचित्र ठेवून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ADVERTISEMENT












