Exclusive: ‘अजितला तीनदा उपमुख्यमंत्री केलं, पण सुप्रियाला…’, शरद पवार अखेर मनातलं बोललेच!

साहिल जोशी

08 Jul 2023 (अपडेटेड: 08 Jul 2023, 12:12 PM)

आपल्यावर अन्याय झाला असा अजित पवार यांनी आरोप केला होता. याच आरोपाला शरद पवार यांनी मुंबई Tak च्या Exclusive मुलाखतीतून प्रत्युत्तर दिलं आहे.

ajit pawar alleged injustice with him sharad pawar has responded ajitdada 3 time dcm supriya sule nothing get exclusive interview mumbai tak

ajit pawar alleged injustice with him sharad pawar has responded ajitdada 3 time dcm supriya sule nothing get exclusive interview mumbai tak

follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं बंड केल्याने फूट पडली आहे. यानंतर आता विखुरलेला पक्ष सावरण्याासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे स्वत: मैदानात उतरले आहेत. पण अजित पवारांनी असा आरोप केला होता की, सुप्रिया सुळेंमुळे (Supriya Sule) आपल्याला संधी देण्यात येत नाही. अजित पवारांच्या याच आरोपाला आता शरद पवार यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनातील अनेक गोष्टी बोलून दाखवल्या. (ajit pawar alleged injustice with him sharad pawar has responded ajitdada 3 time dcm supriya sule nothing get exclusive interview mumbai tak latest news in maharashtra politics)

हे वाचलं का?

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांनी मुंबई Tak (Mumbai Tak) ला Exclusive मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांना अजित पवारांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

‘अजितला तीन-चार वेळा उपमुख्यमंत्री पद दिलं, पण…’

साहिल जोशी: एवढ्या वर्षानंतर अजित पवार पहिल्यांदा तुमच्याविरोधात बोलताना दिसले. त्यांनी सरळ सांगितलं की, तुम्ही वंशवादाला खतपाणी घालता, ते तुमचे पुत्र नाहीत म्हणून त्यांना संधी मिळाली नाही. हे उत्तराधिकारी निवडल्यामुळे घडलंय?

शरद पवार: मी याबाबत काही जास्त बोलू इच्छित नाही.. कुटुंबाबाबतचे जे मुद्दे आहेत त्याविषयी मला जास्त बोलायचं नाही. ते मला आवडतही नाही. फक्त एकच गोष्ट मी आपल्या निर्दशनास आणू इच्छितो की, अजित पवार यांना सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद दिलं. तीन ते चार वेळा उपमुख्यमंत्री म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली.

ते बोलतात सुप्रियाबाबत.. ही तुलना बघा की.. एकाला तीन ते चार वेळा उपमुख्यमंत्री आणि एकदा मंत्रिपद.. आणि दुसऱ्याला एकही असं महत्त्वाचं पद दिलं नाही.

हे ही वाचा >> Sharad Pawar Interview: अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारांची Mega Exclusive मुलाखत जशीच्या तशी

भारत सरकारमध्ये जेव्हा मंत्री बनविण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली तेव्हा सूर्यकांता पाटील यांना संधी दिली. त्यावेळी सुप्रिया ही खासदार होती. दुसऱ्या वेळी संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हा आमचे संगमा यांच्या मुलीला संधी दिली.. तेव्हाही सुप्रिया संसदेत होती. आणि तिसऱ्या वेळी प्रफुल पटेल यांना संधी दिली पण सुप्रियाला मंत्री बनवलं नाही.

प्रफुल पटेलांची मंत्रिमंडळात तेव्हा एंट्री झाली होती जेव्हा की, ते लोकसभा निवडणुकीत हरले होते. पण जेव्हा सुप्रिया सुळे या संसदेत असताना देखील मी इतर लोकांना संधी दिली होती.

हे ही वाचा >> ‘तुम्हाला त्याग करावा लागेल..’, BJP आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. यामुळे आपल्यावर जे आरोप करण्यात येत आहेत ते बिनबुडाचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘गेम प्लॅन भाजपच्या हेडक्वॉर्टरमधून तयार झाला..’

दरम्यान, यावेळी शरद पवार असंही म्हणाले की, ‘एक सरळ गोष्ट आहे की.. भाजपसोबत जायचं होतं. हे सगळं जे काही बनतं आहे.. जे काही अॅक्शन घेत आहेत त्याचा गेम प्लॅन हा भाजपच्या हेडक्वॉर्टरमधून तयार झाला आहे. ते जसं सांगतायेत तसं आमचे सहकारी करत आहेत. यापेक्षा जास्त दुसरी कोणतीही बाब नाही..’ असा आरोपच शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

    follow whatsapp