नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांसाठी काळजी करणारी पोस्ट, 6 शब्दात काय म्हणाले?

Nitesh Rane on Sanjay Raut : नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांची काळजी करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Nitesh Rane on Sanjay Raut

Nitesh Rane on Sanjay Raut

मुंबई तक

02 Nov 2025 (अपडेटेड: 02 Nov 2025, 10:37 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांसाठी 6 शब्दात पोस्ट

point

नितेश राणे नेमंक काय म्हणाले?

हे वाचलं का?

Nitesh Rane on Sanjay Raut, Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची गेल्या दोन दिवसांपूर्वी तब्बेत बिघडली असून, त्यांनी पुढील दोन महिन्यांसाठी सामाजिक आणि राजकीय उपक्रमांपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. त्यांच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

नितेश राणे काय म्हणाले? 

संजय राऊत आणि राणे कुटुंब यांच्यात अनेकदा मोठा वाद झालेला पाहायला मिळाला आहे. दोघांनी एकमेकांवर नेहमी सडकून टीका देखील आहे.. मात्र, राऊत यांच्या आजारपणाची बातमी समजताच नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले, “संजय राऊतजी... काळजी घ्या, लवकर बरे व्हा!” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

हेही वाचा : '...तर मराठी पैलवानावर अन्याय होईल', सिकंदर शेखसाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून पंजाब सरकारशी बोलणी सुरु

आजारपणाबाबत संजय राऊत यांची पोस्ट

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती — जय महाराष्ट्र! आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम याबद्दल आभार. मात्र, सध्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यामुळे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहावे लागणार आहे. मी लवकरच पूर्ण बरा होऊन नवीन वर्षात आपल्यासमोर येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.”

आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांच्या शुभेच्छा

संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “लवकर बरे व्हा” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही पक्षांतील नेत्यांनी त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनीही एक्सवर लिहिले, “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाचा सामना तू डोळ्यात डोळे घालून करतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

CCTV: निखील कांबळे मागून आला आणि सिद्धारामचा घेतला जीव, कुऱ्हाडीचे वार घालतच बसला.. नेमकं असं घडलं तरी काय?

    follow whatsapp