पीएम मोदी पाया पडले अन् आनंदाने मिठीही मारली, माखनलाल सरकार आहेत तरी कोण?

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर भाजप सरकारचा भव्य शपथविधी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला प्रथम मिठी मारली, त्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

PM Modi in West Bengal

PM Modi in West Bengal

मुंबई तक

09 May 2026 (अपडेटेड: 09 May 2026, 03:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मिठी मारली, आशीर्वाद घेतले...

point

बंगालमधील शपथविधीवेळी नरेंद्र मोदी कुणाच्या पाया पडले?

PM Modi in West Bengal : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर भाजप सरकारचा भव्य शपथविधी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज मंचावर उपस्थित होते. दरम्यान, या सोहळ्यात एक अतिशय हृदयस्पर्शी घटना पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर पोहोचताच त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला प्रथम मिठी मारली, त्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि बराच वेळ ते त्यांच्याशी आपुलकीने बोलत राहिले. यादरम्यान त्या वृद्धाचे डोळे पाणावले. हा प्रसंग तात्काळ चर्चेचा विषय बनला. शुभेंदु अधिकारी यांच्या शपथविधीच्या मंचावर पंतप्रधान मोदींनी नेमकी कोणाला मिठी मारली? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

हे वाचलं का?

मोदींनी कोणाचा घेतला आशीर्वाद?

आता समोर आले आहे की, पंतप्रधान मोदींनी मंचावर पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्वात ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या माखनलाल सरकार यांचा आशीर्वाद घेतला आहे. 98 वर्षीय माखनलाल सरकार यांची गणना स्वातंत्र्यानंतर भारतात झालेल्या राष्ट्रवादी आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या सुरुवातीच्या जमिनीवरील कार्यकर्त्यांमध्ये केली जाते.

1952 मध्ये ते श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते. याच काळात त्यांना अटकही झाली होती. 1980 मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर त्यांना पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांचे संघटन समन्वयक बनवण्यात आले. केवळ एका वर्षाच्या आत त्यांनी सुमारे 10 हजार नवीन सदस्यांना पक्षाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे ही वाचा : 116, 117 की 118..., थलपती विजय यांना किती आमदारांचा पाठिंबा? राजभवनातील सूत्रांनी आकडा सांगितला

स्वातंत्र्यपूर्व काळापासून RSS सोबत

1981 पासून सलग सात वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. त्या काळात ही एक विलक्षण उपलब्धी मानली जाते, कारण सामान्यतः भाजप नेते कोणत्याही एका संघटनात्मक पदावर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहत नसत. सिलिगुडीच्या डाग गावचे रहिवासी असलेले माखनलाल सरकार 1945 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. त्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काम केले असून बंगालमध्ये राष्ट्रवादी विचारधारा पुढे नेण्याच्या सुरुवातीच्या संघर्षांचे ते साक्षीदार राहिले आहेत. आज ज्या 'बंगाल निर्माणाची' चर्चा भाजप करत आहे, तेच स्वप्न माखनलाल सरकार यांनी दशकांपूर्वी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत पाहिले होते.

हे ही वाचा : 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक

राम मंदिर ते राम मंदिर निर्माणापर्यंत

त्या काळात बंगालमध्ये आरएसएस किंवा संघाची ओळख मर्यादित होती, परंतु माखनलाल सरकार सातत्याने संघटनेच्या कामात सक्रिय राहिले. त्यांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आणि अनेक ऐतिहासिक घटनांचे ते प्रत्यक्ष साक्षीदार बनले. राम मंदिर आंदोलनापासून ते राम मंदिर निर्मितीपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी डोळ्यांनी पाहिला. इतकेच नाही तर शिलापूजनही त्यांच्या घराच्या अंगणात झाले होते. आता त्यांची पत्नी आणि मुले त्या आठवणी भावूक होऊन सांगत आहेत. असे सांगितले जात आहे की, कालच पक्षाकडून निर्देश आले होते की माखनलाल सरकार यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायचे आहे. त्यानंतर त्यांचा धाकटा मुलगा त्यांना घेऊन कोलकात्याला रवाना झाला.

हे ही वाचा : सांगली हादरली, दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचा सुपारी देऊन खून; 24 तासात उलगडा

कुटुंबिय झाले भावूक

सकाळपासूनच त्यांची पत्नी पुतुल सरकार आणि मुलगा मणिक सरकार टीव्हीसमोर बसून होते. जेव्हा पंतप्रधानांनी मंचावर माखनलाल सरकार यांना मिठी मारली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला, तेव्हा त्यांच्या कुटुंबाचे डोळे भरून आले. कुटुंबाने भावूक होऊन सांगितले की, "बाबांनी ज्या संघर्षाची सुरुवात केली होती, ज्या आदर्शांसह आयुष्य व्यतीत केले होते, आज वडिलांनी तेच आदर्श प्रस्थापित होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेत."