'राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत...', सदावर्ते हे काय बोलून गेले?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या शाई आणि ऑईल फेकीच्या प्रकारावर संताप व्यक्त केला.

referring to mns chief raj thackeray by his first name adv gunaratna sadavarte reacts to incident involving throwing of ink and oil that took place in jalna today

Gunaratna Sadavarte

मुंबई तक

• 07:00 AM • 10 May 2026

follow google news

जालना: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज जालन्यात आपल्या गाडीवर झालेल्या शाई आणि ऑइल फेकण्याच्या प्रकाराची तीव्र निंदा केली. यासोबतच राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत वैचारिक लढाईसाठी खुलं आव्हानही दिलं.

हे वाचलं का?

सदावर्ते म्हणाले, “राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत...” त्यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान देताना सांगितलं की, “राज ठाकरे तू म्हणशील तिथे येतो, आपण वैचारिक चर्चा करू. तू जर हारला तर तू उठाबशा काढ, आम्ही जर हारलो तर म्हणेल ती शिक्षा भोगू.”

सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला, “तुमची वैचारिक लढण्याची कुवत संपली का? तुम्ही दोघे बाबा लोकं झालेत का?” त्यांनी पुढे म्हटलं, “आजचे लोकं छटाक दारू पिणारे होते का?” अशी जहरी टीका यावेळी त्यांनी केली.

संविधान आणि कायद्याचा दाखला

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी घटनात्मक मूल्यांवर भर देताना स्पष्ट केलं की, “भारताच्या संविधानाचे मेकॅनिझम वाकत नसते. कानून के हात लंबे होते है, और संविधान के हात मजबूत होते है. राज ठाकरेचे दूधखुळे विचार किंवा जरांगेचे कुचे विचार या दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे व थकणारे नाही.”

हे ही वाचा>> दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का, किती मतांनी पराभूत? मस्साजोगच्या निवडणुकीत काय घडलं?

सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर सर्वांत गंभीर आरोप करताना म्हटलं की, “जरांगे आणि राज ठाकरे देशाचे तुकडे पाडूची भाषा बोलतात.”

घटना आणि पार्श्वभूमी

जालना जिल्ह्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी शाई आणि ऑइल फेकल्याची घटना घडली. या घटनेनंतर सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत ही प्रतिक्रिया दिली. सदावर्ते हे विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारे वकील आणि कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

हे ही वाचा>> 'तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं', कथित कीर्तनकारांनी एकटे असताना गाठलं, विकास लवांडेंवर शाईफेक

सदावर्तेंनी केलेल्या या तीव्र आणि थेट टीकेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकांवर सदावर्ते यांचा हा हल्ला वैचारिक स्तरावर मोठी चर्चा निर्माण करणारा ठरला आहे.

ही घटना आणि सदावर्तेंची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घुसळणीत नवी भर घालणारी ठरली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.