संतोष बांगर यांना मोठा दणका, महिलेला बटण दाबायला सांगितल्याने फडणवीस संतापले, आता मोठी कारवाई

Santosh Bangar : मतदान केंद्रावर गेल्यानंतर महिलेला बटण दाबायला सांगणे, संतोष बांगर यांना भोवलंय. गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Santosh Bangar

Santosh Bangar

मुंबई तक

02 Dec 2025 (अपडेटेड: 02 Dec 2025, 03:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष बांगर यांना मोठा दणका,

point

महिलेला बटण दाबायला सांगितल्याने फडणवीस संतापले

point

आता बांगर यांच्यावर मोठी कारवाई

Santosh Bangar , Hingoli : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संतोष बांगर यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना संतोष बांगर यांनी गोपनियतेचा भंग केला होता. एका महिलेला मतदान केंद्रावर जाऊन कोणतं बटण दाबायचं? हे बांगर यांनी सांगितलं होतं. याशिवाय ते मतदान केंद्रावर फोनवर गप्पा मारताना देखील पाहायला मिळाले होते. अखेर संतोष बांगर यांच्यावर पहिली मोठी कारवाई झालीये. गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.

हे वाचलं का?

हेही वाचा : रायगड नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलावर बंदूक रोखली, सुशांत जबरेंना बेदम मारहाण

संतोष बांगर यांच्या कृतीमुळे देवेंद्र फडणवीसही संतापले 

आरोपीने मतदान कक्षात जाऊन एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनियतेचा भंग केला तसेच घोषणा दिल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "मला असं वाटतं की, किमान लोक प्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. लोक प्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देत आहोत, काय संदेश देत आहोत याचा विचार केला पाहिजे, असं माझं मत आहे." असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील केंद्र क्र. 3 मध्ये जाऊन एका महिलेला मतदान करताना चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केला होता. त्यानंतर विरोधकांकडून आमदार संतोष बांगर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता आमदार संतोष बांगर यांच्या वरती हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत पुन्हा दाखल झाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO

    follow whatsapp