Supriya Sule Ajit Pawar Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात घमासान सुरू झालं आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभेसाठी लढाई होणार हे निश्चित झालं आहे. एकीकडे अजित पवार सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी फिल्डिंग लावताना दिसत आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही आता थेट अजित पवारांवर वार केला आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील वडगाव भागात सुप्रिया सुळेंचं एका कार्यक्रमात भाषण झालं. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांचा कुठेही उल्लेख केला नाही. मात्र, त्यांच्या रोख स्पष्टपणे त्यांच्या दिशेनंच होतं. अजित पवार हे सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन बारामतीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. त्याचाच आधार घेत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर पलटवार केला आहे.
सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझ्या खासदारकीवर माझं घर नाही चालत. कशाला चालायला पाहिजे. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. नवऱ्याचं काय काम आहे इकडे (राजकारणात). आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला... खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही."
हेही वाचा >> "पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचं, तर ठाकरेंना मुलाला"; शाहांचा घणाघात
"कशाला माझ्या नवऱ्याने... तुम्हाला असं पाहिजे? नवऱ्याने भाषण केलेलं चालेलं का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार आहे? नवऱ्याने कॅण्टीनमध्ये बसायचं. माझा नवरा येतही नाही. ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना, त्याने यायचं पार्लमेंटमध्ये... बायको आत गेली की, कॅण्टीनमध्ये बसायचं पर्स घेऊन. (लोक हसले) मी चेष्टा करत नाहीये. मी गांभीर्याने बोलत आहे", असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला आहे.
नवरा कॅण्टीनमध्ये...
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "मॅडम, पार्लमेंटमध्ये नोटपॅड लागतो, पर्स नाही लागत. पर्समध्ये कुठे पैसे देणार आहोत. तिथे नोटपॅड, पेन किंवा आयपॅड लागतो आणि मग पार्लमेंटमध्ये जाता येतं. नवऱ्याला त्या परिसरात कुठेही परवानगी नसते. कॅण्टीनमध्ये बसा."
हेही वाचा >> अजित पवार बारामतीत झाले भावूक; म्हणाले, "मला एकटं पाडण्याचा..."
"मग तु्म्हाला कसा पाहिजे खासदार? जो तिथे बोलणारा पाहिजे की, नवरा बोलणारा पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? भाषण करतील. द्याल का मतं? कुणाकडे बघून मतं देणार मी की सदानंद सुळे? जाणार कोण तिथे मी. त्यामुळे विचार करून मतदान करा" -सुप्रिया सुळे
"कितीही सदानंद सुळे उत्तम भाषण केलं, तरी शेवटी पार्लमेंटमध्ये जाऊन मला बोलायचं आहे. विषय मला जाऊन मांडायचे आहेत. आणि तिथे लढायचंही मलाच आहे", असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडून सुरु असलेल्या प्रचाराला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
