संविधान असेपर्यंत कोणते पक्ष टिकतील? अंकशास्त्रज्ञांनी चिन्हावरून सांगितलं लॉजिक

मुंबई तक

Navneet mandhani : अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी मुंबई तक बैठकशी संवाद साधला होता. मुलाखतीदरम्यान त्यांनी राजकीय नेत्यांच्या मूलांकावरून त्यांच्या गुणांबाबतची माहिती दिली होती. अशातच आता त्यांनी या देशातील पक्षाच्या चिन्हांचा दाखला देत नेमकं कोणता पक्ष अधिक काळ टिकेल याची शक्यता वर्तवली आहे. 

ADVERTISEMENT

Navneet mandhani
Navneet mandhani
Google CTA

बातम्या हायलाइट

point

काँग्रेस, भाजप, शिवसेना UBT, राष्ट्रवादी (SP) आणि शिवसेनेच्या चिन्हाबाबत माहिती

point

रेल्वे इंजिन, मशाल, रेल्वे इंजिन आणि तुतारीबाबत काय सांगितलं? 

Navneet Mandhani : अंकशास्त्रज्ञ नवनीत मानधानी यांनी मुंबई तक बैठकशी संवाद साधला होता. मुलाखतीदरम्यान त्यांनी राजकीय नेत्यांच्या मूलांकावरून त्यांच्या गुणांबाबतची माहिती दिली होती. तसेच त्यांनी राजकीय नेत्यांच्या स्वाक्षरीवरून देखील त्यांचा स्वभाव गुणांबाबतची माहिती दिली. मूलांकावरून येणाऱ्या निवडणुकीत नेमकं तरुण मुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते, असा देखील अंदाज वर्तवला होता. अशातच आता त्यांनी या देशातील पक्षाच्या चिन्हांचा दाखला देत नेमकं कोणता पक्ष अधिक काळ टिकेल याची शक्यता वर्तवली आहे. 

काँग्रेस, भाजप, शिवसेना UBT, राष्ट्रवादी (SP) आणि शिवसेनेच्या चिन्हाबाबत माहिती

काँग्रेस, भाजप, शिवसेना UBT, राष्ट्रवादी (SP) आणि शिवसेनेच्या चिन्हावरून नेमका कोणता पक्ष देशात राज्यघटना असेपर्यंत राहिल, याचा अंदाज सांगितला आहे. त्यांनी सांगितलं की, "काँग्रेस पक्षाचं हाताचा पंजा आहे. हा पक्ष संविधान असेपर्यंत टिकून राहील. कारण हाताचा पार्श्वभाग हा सामावून घेणारा असून पाया मजबूत आहे," असं त्यांनी सांगितलं. 

भाजप पक्षाच्या कमळ चिन्हाबाबत काय सांगितलं? 

नंतर त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हाबाबत सांगितलं की, "देशात भाजपच्या कमळ या चिन्हाच्या खाली चांगला पाया आहे. या पक्षात तळागळातून आलेले लोक असून हा पक्ष संविधान देशात आहे तोवर टिकेल."

धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत पक्षाची स्थिती काय?

नंतर पुढे त्यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाबाबत पक्षाची स्थिती सांगितली. ते म्हणाले की, "शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह सर्वाधिक स्थिर आहे. यामुळे हा पक्ष अधिक काळ टिकेल."

हे वाचलं का?