Personal Finance: कार खरेदी करण्यापूर्वी वापरा 20/4/10 चा भन्नाट फॉर्म्युला, नाहीतर होईल पश्चाताप
Personal Finance Tips For Car: गाडी खरेदी करण्यापूर्वी काही फॉर्म्युला लागू केला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे कार खरेदी करताना तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कार खरेदी करण्यापूर्वी आपल्या बजेटचाही करा विचार
कार खरेदी करण्यासाठी काही खास फॉर्मुल्यांचा अभ्यास करा
आपल्या बजेटनुसार कार घेण्याचा प्रयत्न करा
मुंबई: कार खरेदी करण्यापूर्वी अनेकदा लोक फक्त त्यांची आवड काय आहे याचाच केवळ विचार करतात. डाउन पेमेंट करून आणि EMI ठरवून आपण सगळं काही भविष्यावर ढकलून देतो. पण जेव्हा आपले मासिक बजेट बिघडू लागते, तेव्हा तीच गाडी आपल्याला त्रासदायक वाटू लागते. अशावेळी आपण जो निर्णय घेतलेला असतो तो कसा चुकीचा होता याचाच विचार करत बसतो. एवढंच नव्हे तर आपली कार विकण्याचा देखील विचार करतो.
या सगळ्याचा त्रास जर आपल्याला नको असेल तर गाडी खरेदी करण्यापूर्वी काही एक फॉर्म्युला लागू केला तर बऱ्याच गोष्टी स्वच्छ आणि स्पष्ट होतील. एखादे चांगले डील मिळाल्यास तुमच्या मासिक बजेटवर अजिबात परिणाम होणार नाही. तसेच तुमच्या कारच्या देखभालीचा तुम्हाला त्रासही होणार नाही. एकंदरीत, तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कारमध्ये फिरण्याचा आनंद मिळेल आणि वेळोवेळी तिची देखभाल करण्यास देखील आपण सक्षम असाल. जेव्हा तुम्हाला गाडी बदलायची असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या कारची चांगली किंमतही मिळेल.
हे ही वाचा>> SIP गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा? जर तुम्ही या Tips केल्या फॉलो तर तुमचे पैसे बुडणार नाहीत, व्हाल श्रीमंत
सुनिताची ड्रीम कार अन्...
सुनिता देखील तिचा 'ड्रीम कार' खरेदी करण्याचा विचार करत आहे. सुनिताचा पगार दरमहा 80 हजार रुपये आहे. ती आतापर्यंत सार्वजनिक वाहतूक वापरत आहे. आता तिला गाडीने ऑफिसला जायचे आहे. याचा अर्थ असा की, सुनिताच्या गरजांमध्ये ऑफिसला जाणे, कुटुंबासह फिरणे आणि महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यांनी शहराबाहेर प्रवास करणे समाविष्ट आहे. आता प्रश्न असा आहे की, सुनिताने कोणती बजेट कार खरेदी करावी. पगारासह बजेट आणि कार देखभालीची गणना कशी करावी? याबाबत आम्ही आपल्याला आता काही फॉर्म्युला सांगत आहोत.
तुमच्या पगाराच्या प्रमाणात तुम्ही तुमच्या कारचे बजेट अशा प्रकारे ठरवू शकता.










