Personal Finance: 'ही' आहे प्रचंड भन्नाट सरकारी योजना, FD पेक्षा मिळेल दुप्पट पैसा
Senior Citizen Savings Scheme ही योजना ज्येष्ठ नागरिकांना एकप्रकारे वरदानच आहे. कारण यामध्ये वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाहा FD पेक्षा कशामध्ये मिळतील आपल्याला जास्त पैसे
SCSS योजनेतून मिळेल अधिक व्याज
जाणून घ्या काय आहे SCSS योजना
Senior Citizen Saving Scheme: आपली एकरकमी रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यावर मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी, लोक अनेकदा एफडी (Fixed Deposit) किंवा POMIS (Post Office Monthly Income Scheme) योजनेत पैसे गुंतवतात. जर तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्यांचे पैसे गुंतवायचे असतील तर एफडी आणि पीओएमआयएसपेक्षा ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) हा एक चांगला पर्याय असू शकतो. या योजनेबद्दल बोलायचे झाले तर, त्यातील व्याजदर सध्या FD आणि POMIS पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक फायदेशीर गुंतवणूक ठरू शकते. तथापि, यावरील व्याज मासिक नाही तर तर तीन महिन्याला दिले जाते.
समजा A चे वय 60 वर्षे आहे. त्याच्याकडे 30 लाख रुपये आहेत जे त्याच्या बँक बचत खात्यात पडले आहेत. जर त्यांनी हे पैसे SCSS म्हणजेच ज्येष्ठ नागरिक योजनेत गुंतवले तर त्यांना तीन महिन्याला 61,500 रुपये मिळतील. त्याच वेळी, आज, ज्येष्ठ नागरिकांसाठी FD (फिक्स्ड डिपॉझिट) वरील ही रक्कम दरमहा सुमारे 54,000 रुपये असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सध्या एफडीवरील सरासरी व्याजदर 6 ते 7 टक्के आहे. फक्त काही बँकांमध्येच यावरचे व्याज यापेक्षा जास्त आहे. तर SCSS मध्ये सर्वत्र एक निश्चित व्याजदर असतो.
हे ही वाचा>> Mukhyamantri Vayoshri Yojana : जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये, वाचा 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'ची A टू Z माहिती
एकरकमी रकमेवर व्याजासाठी कोण चांगलं?
ज्येष्ठ नागरिकांचा विचार केल्यास, सुरक्षित गुंतवणुकीसोबतच त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मासिक उत्पन्न आवश्यक आहे. यासाठी, FD आणि POMIS (पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना) हे चांगले पर्याय आहेत. या योजनांमध्ये, मूळ रक्कम सुरक्षित राहते आणि दरमहा व्याजाच्या स्वरूपात पैसे मिळतात. तथापि, जर तुम्हाला जास्त रकमेची आवश्यकता असेल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासाठी अधिक योग्य आहे. यामध्ये एकमेव अडचण अशी आहे की व्याजाची रक्कम मासिक मिळत नाही तर तिमाही मिळते. आता प्रश्न असा आहे की, सध्या कोणत्या योजनेत पैसे गुंतवणे चांगले राहील. तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही हे तुलनात्मक तक्त्याद्वारे स्पष्ट करत आहोत...










