Personal Finance: 1 एप्रिलपासून होणार 6 मोठे बदल, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
6 big changes from April 1 2025: 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपल्यानंतर, 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. या काळात अनेक बदल होणार आहेत.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips: आर्थिक वर्ष 2024-25 हो 31 मार्च रोजी संपणार आहे. 31 मार्चनंतर, 1 एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षात अनेक मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या अनेक घोषणा लागू होणार आहेत. यापैकी काही घोषणांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. ज्याद्वारे तुमचे Personal Finance चा लेखाजोखा ठरवला जाईल.
Personal Finance या सीरीजमध्ये, आम्ही तुम्हाला 1 एप्रिलपासून होणाऱ्या त्या 6 मोठ्या बदलांबद्दल सांगणार आहोत. यातील काही बदल तुम्हाला शांती देतील. त्याच वेळी, काही बदल तुमचा ताण वाढवू शकतात.
TDS मधून सूट, गुंतवणुकीवर परतावा मिळवणाऱ्यासाठी गुड न्यूज
केंद्रीय अर्थसंकल्पात, निर्मला सीतारमण यांनी TDS नियमांमध्ये बदल करून मध्यमवर्गीय आणि वृद्धांना दिलासा दिला आहे. यामध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या (60 वर्षे किंवा त्याहून अधिक) व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा ही पूर्वी वार्षिक 50,000 रुपये होती. आता, ही रक्कम 1 लाख 1 रुपये किंवा त्याहून अधिक झाल्यावर, सरकारला 10 टक्के टीडीएस भरावा लागेल. त्याच वेळी, सामान्य नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा देखील 40,000 वरून 50 हजार रुपये प्रतिवर्ष करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे
आयकरात मोठी सूट
केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये पगारदारांना मोठा दिलासा देत 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले आहे. यापेक्षा जास्त उत्पन्नासाठी कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. हे कर स्लॅब 1 एप्रिलपासून लागू होतील. म्हणजेच, 1 एप्रिलनंतर 12.75 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्वीपेक्षा जास्त पैसे येतील.










