Personal Finance: GPay, phonepe, Paytm साठी 31 जुलैपासून मोठे बदल, जाणून घ्या नियम
UPI New Rules: UPI पूर्वीपेक्षा वेगवान झाले आहे. १६ जूनपासून व्यवहाराचा वेळ कमी करण्यात आला आहे आणि ३१ जुलैपासून बॅलन्स चेक आणि ऑटो पेवर मर्यादा लागू होईल. नवीन अपडेटची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for UPI New Rules: ऑटोरिक्षासाठी पैसे भरणे असो, हातगाडीवरून फळं किंवा भाज्या खरेदी करणे असो, पाणीपुरी खाणे असो किंवा मोठ्या मॉलमध्ये खरेदी करणे असो, लोक आता कॅशऐवजी सर्रासपणे UPI पेमेंटचा वापर करतात. UPI संपूर्ण महिन्यात किती खर्च झाला हे देखील सांगते. सर्व खर्चाची नोंद ठेवण्यासोबतच, ते काही सेकंदात पैशांचं आदान-प्रदान देखील करतं.
अलिकडच्या काळात, पीक अवर्समध्ये वाढलेल्या लोडमुळे UPI सिस्टम अनेक वेळा क्रॅश झाल्या आहेत. PWC या कन्सल्टन्सी कंपनीच्या अहवालानुसार, संबंधित पार्टींना 1000 रुपयांच्या व्यवहारावर 2.5 रुपये खर्च करावे लागतात. हे पैसे यूजर्सकडून वसूल केले जात नाहीत. म्हणजेच, यूजर्स वाढले असले तरी यूपीआयशी संबंधी पायाभूत सुविधा मात्र वाढलेल्या नाहीत. त्यामुळे खर्चाची भरपाई केली जात नाहीए.
पेमेंट सुधारण्यासाठी केलेले बदल
UPI सुधारण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. ट्रान्झेक्शन जलद होण्यासाठी ट्रान्झेक्शनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा बदल 16 जूनपासून लागू करण्यात आला आहे. आता 31 जुलैपासून आणखी काही बदल लागू केले जातील.
पर्सनल फायनान्सच्या (Personal Finance) या सीरीजमध्ये, आशिषच्या कथेतून हा संपूर्ण बदल समजून घेऊया. आशिष दररोज किमान 15 वेळा त्याचा बँक बॅलन्स तपासतो. कधी GPay द्वारे, कधी PhonePe द्वारे. आता त्याला त्याची ही सवय बदलावी लागेल. कारण देशातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल पेमेंट सिस्टम UPI आता अधिक जलद, स्मार्ट आणि मर्यादित होणार आहे.









