Personal Finance: SIP चा चमत्कार, फक्त 5000 हजार गुंतवा.. मिळतील 1.38 कोटी!

मुंबई तक

Mutual Fund SIP : SIP बाबत आपल्याला चांगलीच माहिती असेल. पण आपल्याला Step -up SIP बाबत माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याची माहिती आम्ही देणार आहोत. Step -up SIP मध्ये  गुंतवणूक करायची असेल तर एक स्मार्ट फॉर्म्युला आहे. जर आपण हा फॉर्म्युला वापरला तर 25 वर्षानंतर आपल्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

बातम्या हायलाइट

point

SIP बाबत आपल्याला चांगलीच माहिती असेल

point

मग आता जाणून घ्या Step -up SIP विषयी

point

मिळणार 1.38 कोटी रुपये

Personal Finance Tips For Mutual Fund SIP : गुंतवणूकदारांना SIP बाबत चांगलीच माहिती असेल. पण आपल्याला Step -up SIP बाबत माहिती आहे का? जर माहिती नसेल तर याची माहिती आम्ही देणार आहोत. Step -up SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक स्मार्ट फॉर्म्युला आहे. जर आपण हा फॉर्म्युला वापरला तर 25 वर्षानंतर आपल्याला कोट्यवधी रुपयांचा फायदा होईल. यासाठी आता केवळ गुंतवणूकदाराने 5 हजार रुपयांची SIP सुरू करावी. या एकूण गुंतवणुकीतून 25 वर्षानंतर 1.38 करोड इतकी कमाई कराल. सध्याच्या वाढत्या महागाईचा सामना करण्यास आपण समर्थ व्हाल. 

कोमल नावाच्या गुंतवणूकदार व्यक्तीचे वय वर्षे हे 25 होते. त्या व्यक्तीला एका खासगी कंपनी नोकरीची संधी मिळाली. तिने प्रति माह 5 हजार रुपये SIP सुरू केली. स्वत:चा उद्योग तयार करण्याचं तिचं लक्ष्य आहे. 

प्रतिमाह 5 हजार रुपये SIP भरल्यास 25 वर्षानंतर एकूण फंड हा 85 लाख 11 हजार 33 रुपये एवढा होईल. तर एकूण गुंतवणूक ही 15 लाख रुपये एवढी असणार आहे. तर त्यापैकी गुंतवणूकदारास 70 लाख रुपयांचा लाभ होईल. 

प्रतिमाह 5 हजारापासून दरवर्षी 1 हजार रुपयांच्या SIP गुंतवणूकीत वाढ करावी. यामुळे एकूण फंड 1.38 कोटी एवढा होईल. तर एकूण गुंतवणूक ही 39 लाख एवढी असेल. त्यातून 99 लाख रुपयांचा लाभ गुंतवणूकदाराला मिळू शकतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp