सोन्या-चांदीचे भाव कडाडले, आजचे भाव वाचून ग्राहकांचं वाढलंय टेन्शन!
Today Gold Rate : श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102000 रुपयांच्या पुढे गेले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 102000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93800 रुपयांवर पोहोचले आहेत. फक्त एका दिवसात सोन्याच्या भावात जवळपास 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
देशातील अनेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर लाखाच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 93 हजारांच्या पुढे गेले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 93960 रुपये झाले आहेत. तसच चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 119000 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92550 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 100970 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 92550 रुपये झाले आहेत.









