Personal Finance: NPS ला विरोध का होतो? कशी आणि किती मिळते पेन्शन?
NPS लागू होत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या नवीन पेन्शन योजनेला विरोध केला. त्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावरुन बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम) म्हणजे नेमकं काय?
NPS ला सरकारी कर्मचाऱ्यांचा विरोध
NPS या नवीन पेन्शन योजनेचं स्वरूप काय?
National Pension System: मुंबई: सध्या, सरकारी कर्मचारी नॅशनल पेन्शन योजनेला (National Pension System) विरोध करत असल्याचं दिसून येत आहे. कर्मचाऱ्यानी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याची मागणी केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात 1 एप्रिल 2004 पासून जुनी पेन्शन व्यवस्था बंद करण्यात आली होती. 1 जानेवारी 2004 पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS लागू करण्यात आले. यामध्ये 1 एप्रिल 2004 पूर्वी सरकारी नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन देण्यात येईल, असे म्हटले आहे.
NPS लागू होत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या नवीन पेन्शन योजनेला विरोध केला. त्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावरुन बरेच प्रश्न निर्माण होत आहेत, NPS ला सरकारी कर्मचारी विरोध का दर्शवत आहेत? NPS ची सुविधा कोणाकोणाला मिळू शकते? याद्वारे पेन्शनची रकमेचं मूल्यांकन कसं केलं जातं? NPS आयकरात काही सूट आहे का?
NPS म्हणजे नेमकं काय?
NPS ही भारत सरकारने सुरू केलेली मार्केट-लिंक्ड पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर, वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळते. यामध्ये, सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळू शकते. तसेच, फक्त सरकारी कर्मचारीच OPS म्हणजेच जुन्या पेन्शनच्या सुविधेसाठी पात्र होते. NPS सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय म्हणून सुरू करण्यात आली होती. 1 मे 2009 पासून ते खाजगी कर्मचाऱ्यांना आणि सामान्य जनतेला देखील देण्यात आले.
हे ही वाचा: वयाच्या 61 व्या वर्षी भाजपचा 'हा' नेता करणार लग्न; कोणासोबत बांधणार लग्नगाठ, थक्क करणारी Love Story










