अजित पवार म्हणाले, “तू माझी प्यारी प्यारी”; सभेत घडला किस्सा, सगळे हसून लोटपोट
अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना हसवत असतात. अजित पवारांच्या मिश्किलपणाची प्रचिती बारामती तालुक्यातील सुपे येथे पुन्हा एकदा अनुभवास आली.
ADVERTISEMENT

– वसंत मोरे, बारामती! अजित पवारांच्या भाषणात अनेकवेळा वेगवेगळे किस्से घडतात आणि उपस्थित लोटपोट होतात. असाच किस्सा घडला बारामतीतील सुपे येथे. उपस्थित लोकांपैकी एकाने प्रश्न विचारला. त्यानंतर अजित पवारांनी जे उत्तर दिले, ते ऐकून हास्याचे तुषार उडाले. (Ajit Pawar Latest news)
अजित पवारांच्या मिश्किलपणाची प्रचिती बारामती तालुक्यातील सुपे येथे पुन्हा एकदा अनुभवास आली. पाणी टंचाईसाठी बारामती तालुक्यातील सुपे येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत काय घडले?
यावेळी अजित पवार यांनी कोणत्या गावासाठी किती निधी उपलब्ध करून दिला आहे, याची यादी वाचून दाखवत होते. याचवेळी एक गावकरी उभा राहिला. अजित पवार म्हणाले, ‘अंकुशराव, काय म्हणत होतात की, ६५ कोटींची योजना आहे. काय अडचण आहे?’
नागरिक म्हणाला, ‘सुप्याची नावे घेतली, पण देवगावचंच नाव त्यात नाही.’ अजित पवारांनी विचारलं, कशात? अरे बाबा तुझी स्वतंत्र योजना आहे. ६५ कोटींची. जळगाव कपत, जळगाव सुपे, देवगाव रसाळ, माळवाडी लोणी, अंजनगावसह आठ गाव आणि ६८ वाड्या. अशी ६५ कोटींची योजना आहे.”
अजित पवारांनी सविस्तर माहिती दिल्यानंतर तो नागरिक म्हणाला की, ‘सॉरी, सॉरी.’ ते ऐकून अजित पवार म्हणाले, ‘तू माझी प्यारी, प्यारी.’ हे ऐकून उपस्थितांना हसू अनावर झाले. सगळेच लोटपोट हसले.
दादा कुठे सापडतोय -अजित पवार
या बैठकीत एक व्यक्तीने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे ‘कायमस्वरूपी पाणी द्या’, अशी चिठ्ठी दिली. यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘मागे एकदा असंच पाणी द्या, पाणी द्या… म्हणत चुकून एक शब्द बोलला गेला. पार वाट लागली वाट. माध्यमांकडे असं म्हणत माध्यमांकडे हात करत हे बसलेलेच असतात असं करून.. कुठं दादा सापडतोय… कुठला शब्द कुठे सापडतोय. एवढाच धंदा यांचा’, असे पवार यावेळी म्हणाले.
‘288 आमदारात सर्वात जास्त काम मी करतो. सुपा परिसरातील जिरायती भागात 653 कोटींची कामे झाली आहेत. त्यातील काही सुरू आहेत. काहीजणांनी सांगितलं मुंबईला बोलावलं, काही मुंबईच्या हातात नाही. सर्व या हातात आहेट, असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली.