Advertisement

'त्या खैरेला हे माहिती नसेल'; चंद्रकांत खैरेंचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

शिंदे-शिवसेना गटात झालेल्या राड्यानंतर चंद्रकांत खैरेंनी केली होती टीका, खैरेंना संजय गायकवाड यांनी बुद्धी भ्रष्ट झाल्याचं म्हणत दिलं उत्तर
shiv sena splits : sanjay gaikwad, chandrakant khaire
shiv sena splits : sanjay gaikwad, chandrakant khaire

एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून फुटले आणि शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद सुरू झाला. सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक संघर्ष बघायला मिळाला, मात्र आता दोन्ही गटांचे कार्यकर्ते रस्त्यांवर भिडताना दिसत आहेत. बुलढाण्यात असाच राजकीय संघर्ष बघायला मिळाला. त्यावरून उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत असलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीकास्त्र डागलं. चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला गायकवाडांनी प्रत्युत्तर दिलं.

झालं असं की, ३ सप्टेंबर रोजी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी काही तरुणांनी अचानक हल्ला केला.

या घटनेत शिवसेना संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. शिंदे गटानेच हा हल्ला केल्याचा आणि आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड याच्यासह कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला.

shiv sena splits : sanjay gaikwad, chandrakant khaire
बुलढाणा : ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; आमदार पुत्रांकडून मारहाण झाल्याचा आरोप

बुलढाण्यात झालेल्या या प्रकारानंतर संजय गायकवाड म्हणाले, 'चुन चुन के मारेंगे'. या सगळ्या प्रकारावरून शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार चंद्रकांत पाटील यांनी संजय गायकवाड यांच्यावर टीका केली.

खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, 'आमदार संजय गायकवाड किती फालतू, थर्ड क्लास आणि कॅरेक्टरलेस माणुस आहे, हे बुलढाण्याच्या लोकांना माहिती आहे.'

चंद्रकांत खैरेंनी टीका केली. त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनीही प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत खैरे यांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाड म्हणाले, 'चंद्रकांत खैरे याची वयोमानानुसार बुद्धी भ्रष्ट झाली असेल, म्हणून ते बोलले.'

shiv sena splits : sanjay gaikwad, chandrakant khaire
बुलढाणा : 'तर' शिवसैनिकाला दुसरी भाषा येत नाही; आमदार गायकवाडांकडून मारहाणीचे समर्थन

पुढे बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'जिल्ह्यातील कोणत्याही महिला, मुलगीवर अत्याचार झाला तर ती मदतीसाठी माझ्याकडे (संजय गायकवाड) येते. पोलिसांकडे जात नाही. भावासारखी आम्हाला हकिकत सांगतात. शिवाय एका निवडणुकीमध्ये रक्ताचे शिक्के मारून मला मतदान केलं होते. त्या खैरेला हे माहिती नसेल. त्याला म्हणावं अगोदर माहिती घे की, येथे शिवरायाचे पाईक बसलेले आहेत म्हणून तुझ्यासारखे दलाल नाहीत', अशा शब्दात संजय गायकवाड यांनी चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in