छत्रपती संभाजीनगरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार

मुंबई तक

ADVERTISEMENT

A tense situation has arisen in Chhatrapati Sambhajinagar city. Two groups of youth clashed outside the Ram temple in Kiradpura area of the city
A tense situation has arisen in Chhatrapati Sambhajinagar city. Two groups of youth clashed outside the Ram temple in Kiradpura area of the city
social share
google news

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी रात्री 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यानदोन गटात हिंसेचा भडका उडाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात राम मंदिराच्या बाहेर हा हिंसाचार घडला. दगडफेक सुरू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच हवेत गोळीबारही करण्यात आला. संतप्त जमावाने जाळपोळ करत पोलिसांची वाहनंही पेटून दिली. या घटनेनंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू आहेत. (A tense situation has arisen in Chhatrapati Sambhajinagar city. Two groups of youth clashed outside the Ram temple in Kiradpura area of the city)

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात राम नवमीच्या पूर्वीच ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील किराडपुरा भागात असलेल्या राम मंदिराच्या बाहेरच हा प्रकार घडला. रात्री 12.30 ते 1 वाजताच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात बिनसलं आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी जमाव जमा झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी अचानक दगडफेक सुरू झाली.

छत्रपती संभाजीनगरात दोन गटात वाद : पोलिसांच्या गाड्या जाळल्या

किराडपुरा भागात दगडफेकीचा प्रकार समजताच शहर पाोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकाड्या फोडल्या, तसेच हवेत गोळीबार केला. पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचे प्रयत्न सुरू असताना समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांसह इतर गाड्या पेटवून देण्यात आल्या. या घटनेत पोलिसांसह पेटवून दिलेली वाहनं जळून खाक झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा – नाव हटवलं आता औरंगजेबाची कबरही जाणार? शिवसेनेची मोदींकडे मोठी मागणी

किराडपुऱ्यात नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगिली घटना

छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता म्हणाले, “किराडपुरा भागात रात्री उशिरा काही तरुणांमध्ये छोट्या गोष्टीवरून बिनसलं. त्यानंतर मोठ्या संख्येने समाजकंटक या भागात जमा झाले होते. त्यांनी दगडफेक केली. काही पोलिसांची आणि काही खासगी वाहनं पेटवून दिले. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना पांगवलं. शांतता असून, राम नवमीनिमित्त जे कार्यक्रम होणार आहे, त्यांना माझं आवाहन आहे की, शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत. या प्रकरणातील दोषींवर पोलीस कडक कारवाई करणार आहे. शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडलं जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – ‘तू लय शिवभक्त झालास का’, स्टेट्सवरून 13 जणांचा शिवसैनिकाच्या घरावर हल्ला

खासदार इम्तियाज जलील यांचं नागरिकांना आवाहन

“राम नवमीचा उत्सव आहे आणि या शहराची एक परंपरा आहे की, सर्व सण उत्सव लोक सगळे एकत्र साजरे करतात. किराडपुरात एक जुनं राम मंदिर आहे. काही समाजकंटक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे नुकसान झालेलं आहे, पण चांगली बाब ही आहे की, राम मंदिरात कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. राम मंदिरात कुणीही शिरले नाही. राम मंदिरातील पुजारी आणि काम करणाऱ्यांना काहीही झालेले नाही. मी पोलीस आयुक्तांना विनंती करणार आहे की, जे समाजकंटक आहेत, त्याच्यामध्ये जास्त तरुण नशा करणारे होते. त्यांना हे समज नाही की ते कुणाला दगड मारताहेत. या घटनेच्या अनुषंगाने पोलीस विभागाने कोंबिग ऑपरेशन करून ड्रग्ज घेतात, त्यांच्यावर कडक कारवाई करा. यामधील दोषींवर कडक कारवाई करावी”, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT