शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला कोर्टाचा झटका, जामीन देण्यास नकार

वाचा कोर्टाने आज काय म्हटलं आहे?
Court refuses to grant bail to Ketki Chitale in post offensive post on Sharad Pawar
Court refuses to grant bail to Ketki Chitale in post offensive post on Sharad Pawar

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेला कोर्टाने झटका दिला आहे. जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे केतकी चितळेचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. तर अॅट्रोसिटी प्रकरणातल्या जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जबाब येणं बाकी आहे. आज ठाणे न्यायालयाने केतकी चितळेचा जामीन नाकारला आहे. त्यामुळे केतकीचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

केतकीने पोस्ट केलेली पोस्ट

"तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)

ही पोस्ट केल्यानंतर केतकी चितळेला अटकही करण्यात आली आहे. तिला याआधीही जामीन मिळू शकलेला नाही. तसंच आजही जामीन मिळालेला नाही. त्यामुळे तिचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

Court refuses to grant bail to Ketki Chitale in post offensive post on Sharad Pawar
शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?

केतकी चितळेने शेअर केलेली पोस्ट मूळ अॅड. नितीन भावे या व्यक्तीची आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती.

या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.

ketaki chitale who has shared distorted posts about sharad pawar has made controversial statements many times before
ketaki chitale who has shared distorted posts about sharad pawar has made controversial statements many times before(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

यापूर्वीही सापडली होती वादात...

केतकी चितळे अशा स्वरुपाच्या पोस्टमुळे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ती अशाच पोस्टमुळे वादात अडकलेली आहे. १ मार्च २०२० रोजी चितळेने एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये ती म्हणाली होती, 'नव बौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात. तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू हा शब्द उच्चारला तर घोर पापी, कट्टरवादी? पण, अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके व्यग्र आहोत. आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात. आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,' असं केतकी म्हणाली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in