‘आता हे सहन होत नाहीये’, मेधा कुलकर्णींचा संयम संपला, चंद्रकांत पाटलांसह भाजपला सुनावलं

मुंबई तक

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांना सुनावलं आहे.

ADVERTISEMENT

medha kulkarin, former mla of bjp from kothrud disappointed on chandrakant patil and party.
medha kulkarin, former mla of bjp from kothrud disappointed on chandrakant patil and party.
social share
google news

Pune political news : ज्यांनी चंद्रकांत पाटलांसाठी आपला विधानसभा मतदारसंघ सोडला, त्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आठवतच असतील. चंद्रकांत पाटील सध्या ज्या कोथरुड मतदारसंघाचे आमदार आहे, तो आधी मेधा कुलकर्णींकडे होता. मेधा कुलकर्णींनी मतदारसंघ सोडला, पण त्यांना डावललं जात असल्याची स्थिती आहे. आता यावर मेधा कुलकर्णींच्याच पोस्ट शिक्कामोर्तब केलंय. त्यांनी एक जळजळीत पोस्ट लिहून चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाला सुनावलं आहे.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिलीये. या पोस्टमध्ये त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केलेला नसला, तरी त्यांचा बोलण्याचा रोख त्यांच्याच दिशेने आहे. इतकंच नाही, तर त्यांनी व्हिडीओ आणि इतर काही गोष्टीही शेअर केल्या आहेत. ‘असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे’, या मथळ्याखाली मेधा कुलकर्णींनी पोस्ट लिहिली आहे.

मेधा कुलकर्णींची फेसबुक पोस्ट

“माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही, पण आता दुःख मावत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी… चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.”

वाचा >> Manipur Violence: ‘मणिपूर जळतंय अन् मोदी हास्य-विनोद…’, राहुल गांधींनी चढवला हल्ला

“चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, ‘तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला.”

हे वाचलं का?

    follow whatsapp