Gautam Adani Net Worth : OCCRP मुळे अदाणींना धक्का! श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर
OCCRP Report effect : ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट्स रिपोर्ट समोर आल्यानंतर गौतमी अदाणींच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.
ADVERTISEMENT

Occrp report on adani group news marathi : भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासाठी 2023 हे वर्ष वाईट ठरलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदाणी समूहावर संशोधन रिपोर्ट प्रसिद्ध केला आणि त्यानंतर अदाणी समूहाला मोठा तोटा सहन करावा लागला होता.
अचानक ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट्स (ओसीआरपी) ने अदाणी समूहाच्या कंपन्यांवर नव्याने आरोप केलेत. आरोपांच्या नव्या मालिकेत अनेक धक्कादायक दावे केले आणि पुन्हा एकदा अदाणींचे शेअर्स कोसळले. गौतम अदाणींच्या नेट वर्थमध्ये घट झाल्यामुळे अब्जाधीशांच्या यादीत अदाणी पुन्हा एकदा टॉप-20 मधून बाहेर पडले आहेत.
अदाणींची एकूण संपत्ती घटली, 22 व्या क्रमांकावर घसरण
गौतम अदाणी यांच्या सध्याच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गेल्या 24 तासांत त्यांच्या संपत्तीत 2.26 अब्ज डॉलर्स म्हणजेच 18,600 कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. त्याचबरोबर गौतम अदाणींची नेट वर्थ देखील $ 61.8 अब्ज पर्यंत कमी झाली आहे आणि अब्जाधीशांच्या यादीत त्यांची 22 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
हेही वाचा >> Adani Group : मॉरिशस फंडातून गुंतवणूक, गुपचूप शेअर्स खरेदी, अदाणी प्रकरण घ्या समजून
भूतकाळात कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे त्यांनी लांब उडी घेत टॉप-20 मध्ये स्थान मिळवले होते आणि जगातील 18 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. मात्र, नवीन अहवाल आल्यानंतर गुरुवारी पूर्णत: घसरलेल्या समभागांच्या किमतीत वाढ झाली.