Nitin Gadkari: “लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही तर पोरं कशी होणार?”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यामध्ये ते शेतकऱ्यांना, फळ उत्पादकांना उद्देशून बोलत आहेत. अमरावती या ठिकाणी झालेलं हे भाषण आहे. या भाषणात त्यांनी जे उदाहरण दिलं आहे त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं आहे. सोशल मीडियावर सध्या नितीन गडकरी यांनी दिलेल्या या उदाहरणाची चर्चा आहे. शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी हे […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. त्यामध्ये ते शेतकऱ्यांना, फळ उत्पादकांना उद्देशून बोलत आहेत. अमरावती या ठिकाणी झालेलं हे भाषण आहे. या भाषणात त्यांनी जे उदाहरण दिलं आहे त्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं आहे. सोशल मीडियावर सध्या नितीन गडकरी यांनी दिलेल्या या उदाहरणाची चर्चा आहे. शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. देवाचा आशीर्वाद जरूर हवा पण लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही तर पोरं कशी होणार? असं उदाहरण नितीन गडकरींनी दिलं आहे.
“पेट्रोल, डिझेल संपणार… आता आपल्याला” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं महत्त्वाचं वक्तव्य
नितीन गडकरी अमरावतीतल्या कृषी शिबीरात नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल चांगल्या पद्धतीने पॅक केला पाहिजे. तर तो चांगल्या पद्धतीने विकला जाईल. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता. पण त्याला पाणी पाजू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. इस्रायल सारखी शेती आपल्याला करायची आहे. पहिल्या क्रमांकावर शेती, दुसऱ्या क्रमांकावर उद्योग व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी.
नितीन गडकरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ते नेमकं काय?
विलास शिंदे यांच्या बागांमधली द्राक्षं जर का लंडनला जाऊ शकतात तर आपली संत्री का जात नाहीत? कशाकरता मागासलं राहायचं आपण? या सगळ्याला पश्चिम महाराष्ट्र थोडाच जबाबदार आहे तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही जर चांगलं उत्पादन काढलंत, चांगलं पॅकिंग केलं तर योग्य होणार आहे. त्यामुळे तुम्हालाच हे करायचं आहे. दरवेळी असं नको व्हायला की एक तर परमेश्वर किंवा सरकार.. देवाने दिलं, देवाने नेलं. असं जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरूर हवा. पण देवाचा आशीर्वाद आहे पण लग्न झाल्यावर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार?शेवटी तुम्हालाही पुढाकार घ्यावा लागतोच ना? हे उदाहरण जास्त चांगलं समजतं.