Jalna Maratha Protestors: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा तुफान लाठीहल्ला, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Jalna Maratha Protestors: मराठा आक्रोश मोर्चाच्या आंदोलनावर अंतरवली सराटीमध्ये चाललेल्या मराठा आक्रोश मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

ADVERTISEMENT

Jalana maratha akrosh morcha lathicharge
Jalana maratha akrosh morcha lathicharge
social share
google news

Jalna Maratha Protestors: जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या मराठा आक्रोश मोर्चाच्या उपोषणाला हिंसक वळण लागलं आहे. जालन्यात (Maratha) मराठा आरक्षणासलाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj jarange patil) यांचे आंदोलन चालू होते. हे आंदोलन चालू असतानाच जरांगे-पाटील यांची प्रकृती बिघडली. याचवेळी पोलिसांबरोबर चर्चा चालू असतानाच अचानक आंदोलनातील नागरिकांवर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज चालू करताच जोरदार गोंधळ उडाला. या लाठीचार्जमध्ये अनेक पुरुष आणि महिला जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आंदोलनाला हिंसक वळण

जालन्यातील अंतरावाली सराटी गावामध्ये शांततेते चालेल्या आंदोलनावर हिंसक वळण का लागले असा आता सवाल उपस्थित केला जात आहे. या लाठीचार्ज नंतर आता दोन बस पेटवल्याचीही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा >> Parliament special session: ‘सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीतच राहा…’ PM मोदी घेणार प्रचंड मोठा निर्णय?

लाठीचार्जमुळे वातावरण चिघळले

मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, चर्चेनंतरही पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळेच हे वातावरण चिघळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पवारांकडून तीव्र निषेध

पोलिसांच्या लाठीचार्जवर राष्ट्रवादीचे शरद पवारा यांनी बोलताना सांगितले की , या घटनेची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारीच आहे. चर्चेनंतरी जर पोलिसांनी आंदोलकांवर जर बळाचा वापर करुन लाठीहल्ला केला असेल तर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp