Pune Crime News: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?
दर्शना पवार हिच्या हत्येबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. आरोपी राहुल हांडोरे याने तिच्या हत्येसाठी राजगड आणि सोमवारच का निवडला होता याविषयी त्याने पोलिसांनी नेमकी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

Pune Crime News: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची (Darshana Pawar) 12 जून 2023 रोजी अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली. तिचा बालपणीचा मित्र राहुल हंडोरे (Rahul Handore) यानेच तिची हत्या केली. ज्यानंतर तो फरारही झाला होता. अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) गुप्त माहितीच्या आधारे राहुलला मुंबईतून बेड्या ठोकल्या. याच प्रकरणात पोलीस तपासात नवी माहिती समोर आली आहे. हत्येची कबुली देणाऱ्या राहुल हांडोरे याने हत्येसाठी सोमवारचाच दिवस का निवडला, दर्शनाला राजगडावरच (Rajgad) का नेलं? हे सगळं आता समोर आलं आहे. जाणून घ्या त्याचविषयी सविस्तरपणे. (mpsc topper darshana pawar murder accused rahul handore pune police rajgad monday kill crime news)
कोपरगावच्या दर्शना पवारच्या हत्याकांडानं अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर शासकीय अधिकारी झालेल्या दर्शनाने खरं तर अनेक स्वप्नं पाहिली होती. MPSC मध्ये मिळवलेल्या यशाने ती हरखून गेली होती. पण राहुल हांडोरेने तिच्या सगळ्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा केला. केवळ लग्नाला नकार दिल्यानं दर्शनाचा लहानपणीचा मित्र असलेल्या राहुल हांडोरेनं तिला सोमवारी (12 जून) पुणे जिल्ह्यातील राजगडावर किल्ल्याचं पायथ्याशी नेलं. ट्रेकिंगचं कारण सांगून तो तिला राजगडावर घेऊन गेला होता.
हे ही वाचा>> तुमच्याही काळजाचा होईल थरकाप, चक्क उकळत्या दुधाने घातली बाळाला अंघोळ!
पण त्याने तिला राजगडावर न नेता पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ इथं नेलं आणि पुन्हा लग्नाचा विषय काढला. दर्शनाने यावेळीही लग्नाला नकार दिला. यावेळी चिडलेल्या राहुलने थेट कटरने मानेवर हल्ला केला. ज्यामुळे तिच्या गळ्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेजारीच पडलेला दगड उचलून थेट दर्शनाच्या डोक्यात घातला. ज्यानंतर त्याने पुन्हा एकदा कटरने तिच्या शरीरावर वार केले. ज्यामध्ये दर्शनाचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला. दरम्यान, हत्येच्या चार दिवसानंतर म्हणजेच 16 जूनला दर्शनाचा मृतदेह सापडला होता.
हत्येसाठी राहुलने सोमवारच का निवडलेला?
दर्शनाच्या हत्येसाठी नराधन राहुलने सोमवारच का निवडला होता? याबद्दलची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. राजगडावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांची शनिवार आणि रविवारी जास्त गर्दी असते. त्या तुलनेत सोमवारी गर्दी फारच तुरळक असते. या सगळ्याचा विचार करुनच राहुलने दर्शनाच्या हत्येसाठी सोमवार निवडला होता.