Rokhthok : ‘सोनिया गांधींना राष्ट्रमाता, राहुलना नेहरू म्हणून घोषित करतील’; बाबा रामदेव यांच्यावर टीकास्त्र
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर बाबा रामदेव यांनी ‘शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत’, असं म्हटलं होतं. याच विधानांवरून रोखठोक सदरातून बाबा रामदेव यांना खडेबोल सुनावण्यात आले आहेत. बाबा रामदेव यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटलं. त्यानंतर आता सामनातील रोखठोक सदरात […]
ADVERTISEMENT

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर बाबा रामदेव यांनी ‘शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत’, असं म्हटलं होतं. याच विधानांवरून रोखठोक सदरातून बाबा रामदेव यांना खडेबोल सुनावण्यात आले आहेत.
बाबा रामदेव यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटलं. त्यानंतर आता सामनातील रोखठोक सदरात बाबा रामदेव यांना थेट तोतया व्यापारी संत म्हणत लक्ष्य करण्यात आलं आहे.
रोखठोक सदरात बाबा रामदेव यांच्याविषयी काय म्हटलं आहे?
“महाराष्ट्र हीच हिंदुत्वाची मूळ भूमी. वीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पहिले सरसंघचालक येथेच निर्माण झाले. त्या महाराष्ट्रात तोतयांचे हिंदुत्व मखरात बसवून पालखीत मिरवले जात आहे. पालखीचे भोई कोण हे काय श्री गणेशाला माहीत नाही. रामदेव बाबा नावाचा एक तोतया व्यापारी संत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस मुंबईत अवतरला व त्याने जाहीर केले, ‘मुख्यमंत्री शिंदे हेच हिंदुत्वाचे गौरव पुरुष असून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहेत!’ बाबा रामदेवांची ही विधाने म्हणजे संतपदास डाग आहे”, असं टीका रोखठोकमधून करण्यात आली आहे.
‘…तर तुमचे पंचप्राण कंठाशी येतील’; ‘घराणेशाही’वरून शिवसेनेचे थेट नरेंद्र मोदींना उलट सवाल