Bhushan Desai: ‘एक चूक महागात पडू शकते’, भाजप नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबई तक

Bhushan desai news today : मुंबई: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांचा शिवसेनेतील प्रवेश उद्धव ठाकरेंना झटका मानला जात आहे. दरम्यान, भूषण देसाईंच्या शिवसेनेतील प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. भाजपच्या गोरेगाव उपाध्यक्षांनी थेट शिवसेनेचे मुख्य नेते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Bhushan desai news today : मुंबई: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांचा शिवसेनेतील प्रवेश उद्धव ठाकरेंना झटका मानला जात आहे. दरम्यान, भूषण देसाईंच्या शिवसेनेतील प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. भाजपच्या गोरेगाव उपाध्यक्षांनी थेट शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंना सूचना वजा इशारा पत्रातून दिला आहे. (BJP Opposes to Bhushan Desai, write letter to Eknath Shinde)

सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांचा प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात असतानाच दुसरीकडे भाजपने मात्र त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला विरोध केला आहे. गोरेगाव भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे.

Bhushan Desai : ‘मुलाचं शिवसेनेत कोणतचं काम नाही…’, सुभाष देसाई प्रचंड दुखावले

भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशाला भाजपचा विरोध, एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात काय?

भाजपचे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विरोध असण्यामागची भूमिका मांडली असून, चूक महागात पडू शकते, असा इशारा वजा सल्लाही दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp