Zepto मध्ये सापडले बुरशी लागलेले पदार्थ अन्... मुंबईकरांनो थोडं सांभाळून बरं!

मुंबई तक

खाद्यपदार्थांमध्ये त्रुटी आढळल्याने धारावीत FDA कडून Zepto चं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. निरीक्षणादरम्यान, काय आढळलं, पाहा.

ADVERTISEMENT

Zepto मध्ये सापडले बुरशी लागलेले पदार्थ अन्... मुंबई FDA ने केली मोठी कारवाई
Zepto मध्ये सापडले बुरशी लागलेले पदार्थ अन्... मुंबई FDA ने केली मोठी कारवाई
google news

बातम्या हायलाइट

point

Zepto स्टोरमध्ये आढळलेले बुरशीजन्य आणि खराब पदार्थ

point

FDA कडून Zepto चं लायसन्स रद्द

point

Zepto स्टोरमधील FDA च्या निरीक्षणात नेमकं काय आढळलं?

FDA againts Zepto: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) खाद्य पदार्थांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे धारावीत Zepto चं लायसन्स रद्द केलं आहे. FDA नेच याची पुष्टी केली आहे. त्याच वेळी, Zepto ने यावर एक विधान दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं, "आम्ही अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी एक पुनर्निचार सुरू केला आहे. यासाठी आम्ही FDA अधिकाऱ्यांशी जवळून काम करत आहोत."

लायसन्स रद्द केल्यावर  चं विधान

FDA ने झेप्टोचं लायसन्स रद्द करण्याबाबत एक निवेदनही जारी केले आहे. निवेदनात एफडीएने म्हटले आहे की, "मुंबईतील किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (Zepto) चा अन्न व्यवसाय परवाना म्हणजेच लायसन्स तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे."

निरीक्षणादरम्यान आढळलेल्या त्रुटी

1. काही पदार्थांवर बुरशी.
2. घाण आणि साचलेल्या पाण्याजवळ उत्पादने साठवणे.
3. नियामक मानकांनुसार थंड साठवणूक तापमान राखले गेले नाही.
4. अन्नपदार्थांचे अव्यवस्थित साठवणूक, काही थेट ओल्या आणि घाणेरड्या जमिनीवर ठेवलेले.

हे ही वाचा: सृष्टी WhatsApp वर पाठवायची मुलींचे 'ते' फोटो, 'तो' घाणेरडा खेळ सुरू करणारी महिला अन्...

प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, Zepto चालवणारी फर्म किरणकार्ट टेक्नॉलॉजीज अन्न सुरक्षा आणि मानके कायदा (2006) तसेच, अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, 2011 चे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.

हे वाचलं का?