धडाम आवाज, लोक हादरले... रक्ताच्या थारोळ्यात दिसला तरूणाचा मृतदेह, R City मॉलमध्ये काय घडलं?

मुंबई तक

सोमवारी सकाळी 11:30 च्या सुमारास आर सिटी मॉलच्या मुख्य लॉबीमध्ये अचानक मोठा आवाज आला. उपस्थित ग्राहक आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पाहिलं तर एका व्यक्तिचा मृतदेह लॉबीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मॉलमध्येच तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

point

38 वर्षाच्या आरोपीनं स्वत:ला संपवलं

point

गजबजलेल्या मॉलमध्ये लोक आवाजानं हादरले

मुंबई : घाटकोपरमधील आर सिटी मॉलमध्ये सोमवारी सकाळी एका घटनेनं हादरला. एका 38 वर्षीय व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना या मॉलमध्ये घडली. मृत व्यक्तीचं नाव दीपक जोशी असं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.

हे ही वाचा >> भरधाव हायवा ट्रक आला आणि फुटपाथवरच्या वाहनांना चिरडत निघाला, चंद्रपुरात पुण्यासारखीच घटना...

सोमवारी सकाळी 11:30 च्या सुमारास आर सिटी मॉलच्या मुख्य लॉबीमध्ये अचानक मोठा आवाज आला. उपस्थित ग्राहक आणि दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. पाहिलं तर एका व्यक्तिचा मृतदेह लॉबीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, दीपक जोशी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचं डोकं फुटलं होतं आणि रक्तस्राव सुरू होता. या भयानक दृश्यानं मॉलमधील लोक हादरले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला.

दीपक जोशी हा घाटकोपरच्या कामा लेनमधील बारोटवाडी येथे आपल्या आई-वडील आणि पत्नीसह राहत होता. त्याचा मुलगा कच्छमध्ये मामाच्या घरी राहून शिक्षण घेत आहे. दीपक हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp