टीव्हीवर कुस्ती बघताना मी थोडा अस्वस्थ होतो, कारण… -शरद पवार
पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मूळचा पुण्यातील आणि नांदेडचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मल्ल शिवराज राक्षेंनं मानाची गदा पटकावली. शिवराज राक्षेने आज शरद पवार यांची पुण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी राक्षेंचं कौतुक करताना कालच्या सामन्याबद्दलचा अनुभवही सांगितला. महाराष्ट्र केसरी पटकावणाऱ्या शिवराज राक्षे याने शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार […]
ADVERTISEMENT

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मूळचा पुण्यातील आणि नांदेडचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मल्ल शिवराज राक्षेंनं मानाची गदा पटकावली. शिवराज राक्षेने आज शरद पवार यांची पुण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी राक्षेंचं कौतुक करताना कालच्या सामन्याबद्दलचा अनुभवही सांगितला.
महाराष्ट्र केसरी पटकावणाऱ्या शिवराज राक्षे याने शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, “शिवराज राक्षेंने नांदेडचं प्रतिनिधीत्व केलं असलं, तर पुणे जिल्ह्यातील राजगुरू नगरमध्ये त्याचं आयुष्य गेलंय. कुस्तीबद्दल आकर्षण होतं. त्याच्यासमोर उद्दिष्ट होतं. त्याने महाराष्ट्र केसरी मिळवून पूर्ण केलं. त्याला आधीच मिळालं असतं, पण त्याला शारीरिक इजा झाली होती. वर्षभर उपचार घ्यावी लागली. ते उपचार महागडे होते.”
पवार पुढे बोलताना म्हणाले, “अनेक खेळांच्या संघटनेच्या बाबतीत माझा पाठिंबा असतो. मदत असते. मग क्रिकेटचं नेतृत्वही मी केलं. त्या त्या क्षेत्रात मी जे करता येईल, ते करण्याची काळजी आम्ही घेतली. भारतीय खेळांची किंमत राखली पाहिजे. त्यामुळे मी या खेळांना मी सहकार्य केलं. मी दोन्ही संघटनेचा देश आणि आशियाई अध्यक्ष होतो. मी ती जबाबदारी घेतली होती.”
ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना मदतीची भूमिका -शरद पवार
“काहीही संकट आलं, तरी पाठिशी उभं राहायचं ही माझी भूमिका राहिली आहे. या सगळ्यांची पार्श्वभूमी ग्रामीण भागातील आहेत. ते श्रीमंत घरातील नाहीत. त्यामुळे घर सोडून राहणं खर्चिक असतं. त्या मुलांना मदत करणं आणि उत्तम प्रकारे प्रशिक्षण देणं महत्त्वाचं आहे. ती जबाबदारी काका पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी उचलली. ही एक मालिका तयार झाली. अभिजित कटके, हर्षवर्धन, उत्कर्ष, राहुल आवारे या सगळ्या मुलांना जी मदत करता येईल, ती आम्ही सतत घेतली”, असं पवार यावेळी म्हणाले.