Naxal encounter : 12 नक्षलवाद्यांचा खात्मा! गडचिरोली पोलिसांची छत्तीसगड सीमेवर 'मोहीम फत्ते'
Gadchiroli Police naxal encounter : गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर मोठी कारवाई करत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक
12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश
अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त
Chhattisgarh naxal encounter : गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांवर मोठा घाव घातला. गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवर मोठी कारवाई करत तब्बल १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. (Major Encounter between Gadchiroli Police and Maoists Today, 12 Maoists Neutralised)
छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज (17 जुलै) सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.
गडचिरोली पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक
या ऑपरेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक स्पेशल ऑपरेशन यांच्या नेतृत्वाखाली सात C-60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> दोन वेळा निलंबन अन् लाखोंची...; पूजा खेडकरांच्या वडिलांचे 'कारनामे'
पोलिसांनी वेढा दिल्यानंतर लपलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यावेळी सदर परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत म्हणजे 6 तासांहून अधिक काळ अधूनमधून गोळीबार सुरू होता.
त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> चेष्टा सुरू असतानाच गेला जीव, तरुणाचा हात लागला अन् महिला एका झटक्यात...
मृत माओवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून, तो टिपागड दलाचा प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम असल्याची माहिती मिळाली. इतर माओवाद्यांची ओळख पटवण्याचे काम आणि परिसरात शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT
एक पोलीस अधिकारी जखमी
C-60 चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले आहेत . त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.
गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील यशस्वी ऑपरेशनबद्दल C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
ADVERTISEMENT