पुण्यात आली अन्... अवघ्या 14 वर्षीच्या अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
उत्तराखंडमधील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे पुण्यातील एका तरूणाशी प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या अल्पवयीन मुलीने एका नवजात बालकाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

पिथौरागढ (उत्तराखंड): उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्हा रुग्णालयात एक 14 वर्षीय अल्पवयीने मुलीने एका नवजात बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवजात बालकाच्या बापाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNI) कलम 64(1), 87, 5/6 तसेच POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एल. एस. खाती यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गर्भवती अल्पवयीन मुलीला प्रसववेदना सुरू झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिभावक म्हणून समितीने आवश्यक सहमती पत्रांवर स्वाक्षरी करून डॉक्टरांना सीझेरियन ऑपरेशन करण्याची परवानगी दिली. यशस्वी प्रसवानंतर मुलगी आणि नवजात बाळ दोघेही स्थिर अवस्थेत आहेत.
काय आहे प्रकरण?
खाती यांच्या माहितीनुसार, मुलीने समितीला सांगितले की तिचे आई-वडील लहानपणीच वेगळे झाले होते. गेल्या वर्षी ती पुण्यात नोकरी करणाऱ्या एका युवकाशी प्रेमसंबंधात आली आणि त्याच्यासोबत पुण्याला गेली. तेथेच ती गर्भवती झाली. मुनस्यारी पोलिस स्टेशनमध्ये या युवकाविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वत:ला नवजात बालकाचा बाप म्हणवणारा तरुण सध्या पुण्यात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोक्सो कायद्यांतर्गत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
हे ही वाचा>> Instagram वर मित्र बनला, सलग 7 दिवस ठेवले शारीरिक संबंध, विद्यार्थिनी प्रेग्नंट होताच...
बाळ आणि मुलीची पुढील व्यवस्था
रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर मुलगी आणि तिच्या नवजात बाळाला विशेष दत्तक ग्रहण एजन्सीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तेथे मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिची पूर्ण काळजी आणि पालनपोषण केले जाईल. बाल कल्याण समितीने यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.









