25 March 2025 Gold Rate: मस्तच.. सोने पुन्हा झालं स्वस्त, आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोनं गडगडलं

मुंबई तक

Today Gold Rate: सोन्याच्या दरात आज मंगळवारी 25 मार्चला घसरण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले सोन्याचे दर आता कमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

सोने पुन्हा झालं स्वस्त (फोटो सौजन्य: Grok AI)
सोने पुन्हा झालं स्वस्त (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घट?

point

काय आहेत 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर?

point

मुंबई, पुण्यात आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate: मुंबई: सोन्याच्या दरात आज (25 मार्च) पुन्हा घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मागील काही दिवसांपासून वाढलेले सोन्याचे दर आता पुन्हा कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे भारतात सोन्याची दरवाढ काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसतं आहे. आज सोनं जवळपास 330 रुपयांनी स्वस्त झालं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89 हजारांच्या पार आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 81 हजारांच्या पुढे गेले आहेत.

मार्केट एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. दुसरीडे आज चांदीच्या दरात मात्र काहीही बदल झालेले नाही. राज्यात एक किलोग्रॅम चांदीचे दर 1,01,000 रुपये झाले आहेत. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर काय

मुंबई: मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89290 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 81850 रुपये झाले आहेत.

पुणे: पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89290 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 81850 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp