बीड नगरपरिषदेच्या इमारतीवर कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

मुंबई तक

Beed Municipal Council Employee's body found hanging in building : बीड नगरपरिषदेच्या इमारतीवर कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरु

ADVERTISEMENT

Beed Municipal Council Employee's body found hanging in building
Beed Municipal Council Employee's body found hanging in building
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड नगरपरिषदेच्या इमारतीवर कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

point

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु, बीडमध्ये खळबळ

Beed Crime,  बीड : शहरातील बीड नगरपरिषदेच्या इमारतीवर आज (दि.8) सकाळी समोर आलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेत वसुली विभागात कार्यरत असलेल्या अविनाश धांडे या कर्मचाऱ्याचा मृतदेह इमारतीच्या छतावर शिडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नगरपरिषदेतील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

छतावर असलेल्या लोखंडी शिडीला लटकलेला मृतदेह आढळला 

अधिकची माहिती अशी की, सकाळच्या सुमारास काही कर्मचारी कामासाठी इमारतीत आले असता त्यांनी छतावर एका शिडीला लटकलेला मृतदेह पाहिला. तात्काळ ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. परिसरात मोठी गर्दी झाली होती, तर पोलिसांनी इमारतीच्या छतावर कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश दिले.

बीड नगरपरिषदेत खळबळ 

मृत अविनाश धांडे हे नगरपरिषदेच्या वसुली विभागात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. मात्र त्यांनी आत्महत्या केलीये की आणखी काही घडलंय? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेमुळे नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गात शोककळा पसरली आहे. अविनाश धांडे यांच्या अचानक मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण बीड शहरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हे वाचलं का?

    follow whatsapp