3rd April 2025 Gold Rate : एप्रिल फूल नव्हे! सोनं खरंच झालं स्वस्त, मुंबईसह 'या' शहरांत सोन्या-चांदीचे भाव घसरले
Today Gold Rate In India : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 3 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबई-पुण्यात आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate In India : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 3 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली आहे. यापूर्वीही सोन्याच्या दरात घट झाली होती. परंतु, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात 20 रुपयांनी घसरण झाली आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात सोन्या-चांदीच्या भावात वाढ होणार आहे.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 92 हजार रुपयांच्या जवळपास आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 82 हजारांच्या पुढे गेले आहेत. चांदीच्या भावातही घट झाली आहे. देशात एक किलोग्रॅम चांदीचे दर 1,04,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92840 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85100 रुपयांवर पोहोचली आहे.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 93380 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 85600 रुपयांवर पोहोचली आहे.










