Maharashtra : देवाच्या दारात काळाची झडप! अकोल्यात सात भाविकांचा जागेवरच मृत्यू
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात भयंकर दुर्घटना घडली. मंदिरालगत असलेल्या शेडवर कडुलिंबाचे झाड कोसळून 7 भाविकांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

7 devotees died after a tree fell on the shed next to the temple in in Balapur taluka of Akola district
Akola temple incident : अकोला जिल्ह्यात असलेल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथे थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. गावातील मंदिरालगत असलेल्या शेडवर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं. या भीषण दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत 29 भाविक जखमी झाले असून, जखमींच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला होता.
बाळापूर तालुक्यातील पारस गावावर रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मृत्यने तांडवच घातलं. पारस येथील महात्मा फुले विद्यालयाजवळ समर्थ बाबुजी महाराज मंदिरात रविवारी अनेक ठिकाणचे भाविक दर्शनासाठी आले होते.
रविवारी सायंकाळी मंदिरात आरती पार पडली. त्यानंतर सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक पाऊस सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांनी मंदिराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडचा आसरा घेतला.