Maharashtra : तसं बोलून फसले! अब्दूल सत्तारांची विकेट जाणार? ‘तो’ पीए कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Agriculture Minister Abdul Sattar is in controversy over his assistant Deepak Gawli case.
Agriculture Minister Abdul Sattar is in controversy over his assistant Deepak Gawli case.
social share
google news

-धनंजय साबळे

Abdul Sattar in Trouble : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादात सापडलेत. स्वतःच बोलून फसलेत. एकनाथ शिंदेंच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच हा वाद समोर आलाय. त्यामुळे विस्तारात कोणाचा नंबर लागण्याआधीच सत्तारांची विकेट जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. आणि हे सगळं एका पीएमुळे घडलंय. नेमकं प्रकरण काय आणि त्यामुळे सत्तारांचं मंत्रिपद कसं धोक्यात आलंय, हेच आपण बघणार आहोत. (Maharashtra Political News)

सरकार ठाकरेंचं असो की शिंदेंचं अब्दुल सत्तार मात्र नेहमीच वादात राहिलेत. एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराआधी सत्तारांचं कनेक्शन थेट टीईटी घोटाळ्याशी जोडण्यात आलं. सत्तारांच्या मुलींचीही नावं या घोटाळ्यात असल्याचे आरोप अगदी विस्ताराच्या आदल्या दिवशी झाले. पण या सगळ्या आरोपांवर कडी करत ठाकरे सरकारमध्ये निव्वळ राज्यमंत्री असलेले सत्तार शिंदे सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री झाले. प्रमोशन झालं!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Mallikarjun Reddy : फडणवीसांसमोरच शिंदेंच्या आमदारावर टीकास्त्र, काय घडलं?

कृषी खात्यासारखं राज्यभर प्रभाव, व्याप्ती असलेलं खातं मिळालं. नवं खातं मिळालं असलं, तरी सत्तार जुन्याच कारभाराने वादात सापडले. गेल्या हिवाळी अधिवेशनात सत्तारांवर गायरान जमीन प्रकरणात खळबळजनक आरोप झाले. ३७ एकर गायरान जमिनीत मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचे आरोप झाले. त्याचवेळी सिल्लोड महोत्सवात कृषी अधिकाऱ्यांना वसुलीचं काम लावल्याचे आरोपही सत्तारांवर झाले. याच आरोपांमुळे सत्तारांचं मंत्रिपद औटघटकेचं ठरेल, असं म्हटलं गेलं. विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली. पण सत्तार डंके की चौटपे मंत्रिपदी कायम राहिले.

आता सत्तार पुन्हा एकदा वादात सापडलेत. आणि यावेळी स्वतः बोलनूही फसलेत. सुरवातीलाच नेमकं घडलं काय ते वाचा…

खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यभर पेरणीची लगबग सुरू झालीय. बोगस बियाणं, खतांची विक्री रोखण्यांचं मोठं आव्हान सरकारपुढे आहे. यासाठी अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या. पण हे पथकच बेकायदेशीर असून ते खासगी व्यक्तींचं असल्याचं समोर आलं. पथकात सहभागी व्यक्ती औरंगाबाद पासिंगच्या गाड्या वापरत होतं. हे पथक दमदाटी करून वसुली करत असल्याचे आरोप करण्यात आले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप-शिवसेना युतीत ‘ठिणगी’! श्रीकांत शिंदे म्हणाले, “खासदारकीचा राजीनामा देतो”

नेहमी सत्तारांभोवती दिसणारे दीपक गवळी हेसुद्धा या पथकात दिसले. सत्तारांसोबत छत्रपती संभाजीनगर, सिल्लोडमध्ये दिसणाऱ्या इतरही व्यक्ती दिसल्या. पण हे पथकच बेकायदेशीर असल्याचं समोर आलं. या पथकाने दमदाटी करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रारही अकोल्याच्या एमआयडीसी पोलिसांत देण्यात आली. त्यामुळे सत्तारांवर विरोधकांकडून चौफेर हल्ला सुरू झाला. राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यानंतर पत्रकारांसमोर येऊन अब्दुल सत्तारांनी दिपक गवळी हा आपला पीए नसल्याचा दावा केला.

ADVERTISEMENT

अब्दुल सत्तारांनी काय केला होता खुलासा?

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी खुलासा करताना सांगितले की, दीपक गवळी माझा स्विय सहायक नाहीये. तो कृषी अधिकारी असून, कृषी विभागाचा कर्मचारी आहे. मात्र, हेच दीपक गवळी अकोल्यातील सत्तारांच्या 10 जूनच्या दौऱ्यात त्यांच्या आजूबाजूलाच फिरताना दिसत होते. गवळीसह दलाल हितेश भट्टड आणि सत्तारांचे कट्टर समर्थक असलेले छत्रपती संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन या कथित पथकासोबत होतेय. मात्र, गोदामावर धाडी टाकलेल्या पथकातील काही लोकांनी व्यापाऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप झालेला आहे.

हेही वाचा >> भाजपचा कल्याणबरोबर ठाणे लोकसभेवरही दावा! CM एकनाथ शिंदेंवर दबाव?

तो मी नव्हेच सारखं सत्तारांनी गवळी माझा पीए नसल्याचं सांगितलं. पण सरकारी पत्रव्यवहारात वेगळंच सत्य समोर आलंय. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयानं २१ मेला कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये दिपक गवळींचा उल्लेख कृषी अधिकारी नव्हे, तर कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे स्वीय सहाय्यक असा करण्यात आलाय. म्हणजेच कमीत कमी २१ मेपर्यंत गवळी हे सत्तारांचे पीए होते. सरकार दप्तरीच तशी नोंद आहे. यानिमित्तानं खरं कोण, सत्तार की सरकारी दस्तऐवज, असा नवा प्रश्नही निर्माण झालाय.

Agriculture Minister Abdul Sattar in trouble over Deepak Gawli case

पण या सगळ्यांत थेट शेतकऱ्यांशी संबंधित प्रकरणात सत्तारांची कागदपत्रातून वेगळीच बाजू समोर आलीय. त्यामुळे शिंदे सरकारच्या विस्तारात पाचेक मंत्र्यांची विकेट जाणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांचा समावेश असल्याचंही सांगितलं जातं. अब्दुल सत्तारांचंही डच्चू मिळणाऱ्या मंत्र्यांच्या या यादीत नाव आहे. ही यादी चर्चेत असतानाच सत्तारांचं हे नवंच प्रकरण समोर आलंय. त्यामुळे गेल्यावेळी आरोपांनंतरही कॅबिनेट मंत्रिपद मिळवणारे शिंदे सरकारमधले एकमेव मुस्लिम मंत्री असलेल्या अब्दूल सत्तारांची यावेळी विकेट जाणार असं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT