Manoj Kumar Death: बॉलिवूडचे ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन

मुंबई तक

Manoj Kumar Death News: भरत कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ADVERTISEMENT

अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
social share
google news

मुंबई: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी आली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते.  त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले होते, त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने 'भारतकुमार' म्हणत.
 

शनिवारी करण्यात येणार अंत्यसंस्कार 

मनोज कुमार यांच्या पार्थिवावार शनिवारी (५ एप्रिल) दुपारी 12 वाजता मुंबईतील विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार केले जातील. मनोज कुमार यांच्या कुटुंबातील काही सदस्य परदेशात राहतात, त्यामुळे कुटुंबाने शनिवारी अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पार्थिव सध्या कोकिलाबेन रुग्णालयात ठेवण्यात येईल. शनिवारी, त्यांचे पार्थिव त्यांच्या जुहू येथील घरी नेले जाईल.

जीवन आणि कारकीर्द

मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी हरिकिशन गिरी गोस्वामी या नावाने एबटाबाद (सध्याचे पाकिस्तान) येथे झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. फाळणीच्या दुःखद आठवणी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या, ज्याचा प्रभाव त्यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येतो. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार आणि दिलीप कुमार यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी आपले नाव मनोज कुमार असे ठेवले आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

त्यांनी १९५७ मध्ये "फॅशन" या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर "कांच की गुड़िया" (१९६१) मध्ये त्यांनी पहिली मुख्य भूमिका साकारली. पण खरी ओळख त्यांना "शहीद" (१९६५), "उपकार" (१९६७), "पूरब और पश्चिम" (१९७०), "रोटी कपड़ा और मकान" (१९७४) आणि "क्रांति" (१९८१) या देशभक्तीपर चित्रपटांमुळे मिळाली. या चित्रपटांनी त्यांना "भारत कुमार" ही पदवी मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटांमध्ये देशप्रेम, सामाजिक संदेश आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि पटकथा लेखनातही आपली छाप पाडली.

हे वाचलं का?

    follow whatsapp