ISRO : गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्ताला आदित्य L1 ने दिली खुशखबर, महत्वाचा टप्पा पूर्ण
ISRO : आदित्य L1ने आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पृथ्वीचा निरोप घेतला आहे. मंगळवारी रात्री 18 सप्टेंबरला रात्री 2 वाजताच्या सुमारास आदित्य L1ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत पृथ्वीचा निरोप घेतला आहे.
ADVERTISEMENT

सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य L1 हे यान अंतराळात पाठवले होते. या आदित्य L1 ने मोठं यश प्राप्त केले आहे.इस्त्रोने या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. आदित्य L1ने आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पृथ्वीचा निरोप घेतला आहे. मंगळवारी रात्री 18 सप्टेंबरला रात्री 2 वाजताच्या सुमारास आदित्य L1ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत पृथ्वीचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आदित्यला आता एल 1 बिंदूपर्यंत प्रवास करावा लागणार आहे? हा प्रवास किती किलोमीटरचा असणार आहे? त्यासोबत आदित्य सुर्यापासून आणखीण किती अंतर दुर असणार आहे? हे जाणून घेऊयात. (aditya l1 gets send off sun earth l1 point isro performs key manoeuvre)
इस्त्रोने ट्विट करून आदित्य L1बाबत मोठी माहिती दिली आहे. आदित्य L1 ने मंगळवारी रात्री 18 सप्टेंबरला रात्री 2 वाजताच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून पृथ्वीचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आदित्य L1यान आता सुर्याच्या दिशेने निघाले आहे. अंतराळयान आता एका मार्गावर आहे जे त्याला सूर्य-पृथ्वी L1 बिंदूवर घेऊन जाईल. सुमारे 110 दिवसांनंतर एका मॅन्युवरने ते L1 च्या भोवतालच्या कक्षेत टोचले जाईल, अशी देखील इस्त्रोने माहिती दिली आहे. तसेच ट्रान्स-लॅग्रेंजन पॉइंट 1 इन्सर्शन (TL1I) मॅन्युवर यशस्वीरित्या काम करत असल्याची माहिती देखील इस्त्रोने दिली आहे.
Aditya-L1 Mission:
Off to Sun-Earth L1 point!The Trans-Lagrangean Point 1 Insertion (TL1I) maneuvre is performed successfully.
The spacecraft is now on a trajectory that will take it to the Sun-Earth L1 point. It will be injected into an orbit around L1 through a maneuver… pic.twitter.com/H7GoY0R44I
— ISRO (@isro) September 18, 2023
विशेष म्हणजे ही सलग पाचवी वेळ आहे की इस्रोने एखाद्या प्रक्षेपण मार्गावर एखादी वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तु किंवा अवकाशातील स्थानाकडे हस्तांतरित केली आहे.