लग्नानंतर कळलं पती तर…, शेकडो प्रयत्न करूनही वाचवता आला नाही संसार!
लग्नानंतर अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते यात काही शंका नाही. पण ही सगळी तडजोड जेव्हा एकतर्फी होते तेव्हा नातं टॉक्सिक बनत जातं. अशा वेळी लग्न जरी तुटलं नाही तरी त्या नात्यात राहणं कठीण होऊन जातं. अशाच विवाहित महिला आहेत ज्यांनी आपल्या अयशस्वी विवाहाची कहाणी सांगितली आहे.
ADVERTISEMENT

Marriage Failed Cases : लग्नानंतर अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते यात काही शंका नाही. पण ही सगळी तडजोड जेव्हा एकतर्फी होते तेव्हा नातं टॉक्सिक बनत जातं. अशा वेळी लग्न जरी तुटलं नाही तरी त्या नात्यात राहणं कठीण होऊन जातं. अशाच विवाहित महिला आहेत ज्यांनी आपल्या अयशस्वी विवाहाची कहाणी सांगितली आहे. त्यांनी लग्न टिकवूण ठेवण्यासाठी शेवटपर्यंत तडजोड केली पण, त्यांच्या पदरी काही सुख आलं नाही. (After marriage Woman found that her husband is gay She tried to save marriage but nothing Works)
‘मी त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला ज्या त्याला आवडत होत्या…’
एका महिलेने तिच्या मोडलेल्या संसाराची कहाणी सांगितली. ती म्हणाली, ‘मी नेहमी त्याला खूश करण्याचा प्रयत्न करत होते. मला माझ्या नवऱ्यासाठी आदर्श स्त्री व्हायचं होतं. पण लग्नानंतर 5 वर्षांनी मला कळलं की मी किती मूर्ख आहे.
एका स्वार्थी माणसाला खूश करण्यासाठी मी माझा सगळा वेळ वाया घालवला. त्याची आवडीसाठी मी माझी आवड बदलली. कपड्यांपासून ते परफ्युमपर्यंत मी माझ्या इच्छेनुसार काहीही वापरले नाही. माझे छंदही त्यानुसार बदलले. मला माहिती होतं की, हे सर्व चालणार नाही पण जेव्हा तुम्हाला लग्न वाचवायचं असतं तेव्हा तुम्ही सर्वकाही करून पाहाता.’
वाचा : लिफ्टमधून जाताना वाटते भीती? ‘हे’ नियम माहित असतील, तर राहाल टेन्शन फ्री
‘मी त्याचं शिवीगाळ करणंही सहन केलं’
आणखी एका महिलेने तिच्या लग्नाबद्दलची कहाणी सांगितली. ती म्हणाली, ‘पत्नी आणि तीन मुलांची आई या नात्याने मी त्याला माझ्या आयुष्यातील 7 वर्षे दिली जी मी आतापर्यंत केलेली सर्वात मूर्ख गोष्ट होती. माझा पती नेहमीच रागीट स्वभावाचा होता, पण लग्नानंतर आमच्यातलं प्रेम पूर्णपणे संपलं. तो काय बोलतो किंवा करतो यावर त्याचे नियंत्रण नव्हते.