Ajit Pawar: ‘ते म्हणाले, मॅडम, तुम्ही यात पडू नका..’, मीरा बोरवणकरांचा आणखी मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar r r patil maam dont fall into this Meera Borwankar big secret blast Madam Commissioner
Ajit Pawar r r patil maam dont fall into this Meera Borwankar big secret blast Madam Commissioner
social share
google news

Meera Borwankar: माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे मॅडम कमिशनर (Madam Commissioner) हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर अनेक वादांना तोंड फुटले आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (Former Home Minister R. R. Patil) यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या नावापर्यंत नावं घेऊन त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

ADVERTISEMENT

फक्त अजितदादांचेच नाव नाही

मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये त्यांनी 38 प्रकरणं लिहून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पुस्तक प्रकाशन होताच त्यांनी सांगितले की, या आत्मचरित्रामध्ये फक्त अजित पवार यांचेच नाव आहे असं नाही तर 38 प्रकरणातून मी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अजित पवारांच्या नावाला अधोरेखित करुन त्याच्यावर मला प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आधी हे पुस्तक वाचून त्यानंतर मला प्रश्न विचार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

बिल्डरची न्यायालयात याचिका

येरवडा कारागृहाच्या 3 एकर जमिनीच्या प्रश्नावर पुण्यातील एका बिल्डरने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर या जमिनीबाबत अनेक प्रश्न मला विचारले गेले. त्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारागृहाच्या जमिनीबाबत काही समस्या नसतील तर ती जमिन देऊन टाका असं स्पष्टपणे अजित पवार यांनी मला सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग, 2 डबे जळून खाक

हस्तांतराचा प्रश्न

त्यानंतर मी त्यांना माझ्या आधी असलेले सत्यपाल सिंग हे आयुक्त असताना जर तो व्यवहार झाला होता, तर त्याचवेळी का ही जमिन हस्तांतर केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी त्यांनी एक आठवण सांगितले.

आबांचा मला इशारा

येरवडा कारागृहाची जमिनीचा प्रश्न ऐरणावर आलेला असतानाच मला मंत्री अजित पवार यांनी जमिन देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यातील तांत्रिक चुका सांगितल्यानंतर ते काहीही बोलले नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच वेळी त्यांनी आर. आर. आबा पाटील यांनी थेट मला मॅडम, तुम्ही यात पडू नका असा इशारा दिला होता. मात्र त्यावेळच्या सरकारच्या कानावर ही गोष्ट मी सांगितली होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Nikita Rawal: मुंबईत हे चाललयं तरी काय? अभिनेत्रीवर रोखलं पिस्तुल अन्, नंतर…

हस्तांतराला नकार

आर. आर. पाटील यांनी कारागृहाच्या जमिनीबाबत हस्तांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनाही त्यातील त्यातील दोष सांगितले होते. त्यावेळी कारागृहासाठी हीच जमिन महत्वाची असल्याने ती हस्तांतर करण्यासाठी मी नकार दिला होता. त्यावेळी आर. आर. पाटील मला म्हणाले की, मॅडम यात तुम्ही पडू नका असं म्हणत त्यांनी जमिन हस्तांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या,  मात्र मी ते केलं नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT