Govt Jobs : Bank of Baroda मध्ये पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज

मुंबई तक

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी चालून आली आहे.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : Bank of Baroda मध्ये पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

point

लगेच करा अर्ज

Government Jobs : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी तब्बल 5000 जागांची भरती जाहीर झाली आहे. देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत काम करण्याचा आणि बँकिंग क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही पदवीधरांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2026 ही आहे.

वयाची अट

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. वयाची अट 1 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. नियमानुसार, मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल.

हे ही वाचा : पती नर्सचा किस करताना दिसला, डॉक्टर महिलेला सहन झालं नाही; अन्...

मानधन किती?

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते. या 1 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 15,000/- रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. या विद्यावेतनाशिवाय इतर कोणतेही भत्ते किंवा आर्थिक लाभ उमेदवारांना लागू राहणार नाहीत. तसेच, प्रत्येक महिन्याचे विद्यावेतन हे उमेदवारांच्या हजेरीनुसार (विनापगारी रजा वजा करून) महिन्याच्या शेवटी खात्यात जमा केले जाईल.

हे ही वाचा : मुंबईची खबर : दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक दिन, काय आहे MMRDA चा नवा उपक्रम?

अर्जासाठी शुल्क

उमेदवारांनी ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज केला आहे, तिथली स्थानिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे लिहिता, वाचता, बोलता आणि समजता येणे अनिवार्य आहे. अर्जासाठी जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 800 रुपये शुल्क आहे, PWD उमेदवारांसाठी 400 रुपये तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
 

हे वाचलं का?