Mega Block: मुंबईकरांनो, फिरायचा प्लान झालाय? मग आधी मेगा ब्लॉक वेळापत्रक बघा

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Be sure to read about Mega Block on 3rd December before going out on Sunday
Be sure to read about Mega Block on 3rd December before going out on Sunday
social share
google news

Mumbai Local Mega Block : मुंबई आणि उपनगरी भागात रेल्वे ब्लॉक (mumbai local mega block) असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आठवड्यात शनिवारी (2 डिसेंबर) आणि रविवारीही (3 डिसेंबर) प्रवाशांना मध्य रेल्वेत (Central railway) 2 तासांच्या मेगा ब्लॉकला सामोरे जावे लागणार आहे. रविवारी कोणत्या कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल तर वेळापत्रक नक्की पाहा. (Be sure to read about Mega Block on 3rd December before going out on Sunday)

रविवारी 3 डिसेंबरला मध्य रेल्वेकडून तांत्रिक काम आणि दुरुस्तीसाठी मुंबई लोकल रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक नक्की तपासा.

वाचा : NCP : ‘ज्यांना मोठं केलं त्यांनीच…’ शरद पवारांचा अजित ‘दादां’वर पलटवार

मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉकची घोषणा

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 आणि 3 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1.20 वाजल्यापासून कल्याण-अंबरनाथ सेक्शनवर अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कर्जत या ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल रात्री 11.30 वाजता सुटेल आणि खोपोली ते सीएसएमटी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल रात्री 11.15 वाजता सुटेल, असे मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या ब्लॉक दरम्यान, 3 FOB चे गर्डर लाँच केले जातील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा : Animal : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, पहिल्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

3 डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही मेगाब्लॉक नसणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी 11.05 मिनिटांनी सुरु होणार आहे. दुपारी 3.55 मिनिटांनी हा मेगाब्लॉक संपेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

ADVERTISEMENT

वाचा : Crime: सगळेच हादरले! तरूणी शिकत होती स्कूटी, तरुणांनी झुडपात नेऊन केला गँगरेप

हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11.10 मिनिटांपासून ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT