Beed : लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर पुरूष झालेला पोलीस शिपाई झाला बाबा! पत्नीने दिला मुलाला जन्म

रोहिणी ठोंबरे

Beed News : बीड जिल्ह्यात (Beed District) राहणारे ललितकुमार साळवे जन्मानंतर 20 वर्ष स्त्री म्हणून जगले. लिंग बदलून ते ललितकुमार झाले. त्यांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी सीमा नावाच्या मुलीशी लग्न केले. सीमाचे कुटुंब तयार नव्हते तरीही सीमाने आपला निर्णय बदलला नाही आणि ललितशी लग्न केले.

ADVERTISEMENT

Beed News Police Constable Lalit Kumar Who Lived 20 years as a Women After gender Changed he become Father
Beed News Police Constable Lalit Kumar Who Lived 20 years as a Women After gender Changed he become Father
social share
google news

Beed News : बीड जिल्ह्यात (Beed District) राहणारे ललितकुमार साळवे जन्मानंतर 20 वर्ष स्त्री म्हणून जगले. लिंग बदलून ते ललितकुमार झाले. त्यांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी सीमा नावाच्या मुलीशी लग्न केले. सीमाचे कुटुंब तयार नव्हते तरीही सीमाने आपला निर्णय बदलला नाही आणि ललितशी लग्न केले. आता ललित आणि सीमा आई-वडील झाले आहेत. (Beed News Police Constable Lalit Kumar Who Lived 20 years as a Women After gender Changed he become Father)

आपल्या आयुष्याची गोष्ट सांगताना ललित म्हणाला, ‘माझ्या मनात खूप चलबिचल असायची. पूर्वी मी शारीरिकदृष्ट्या एक स्त्री होतो, पण माझ्या भावना पुरुषांसारख्या होत्या. यानंतर मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून मी पुरूष झालो. यानंतर पोलीस दलात रुजू झालो.’

वाचा : Uddhav Thackeray : आशिष शेलारांची ठाकरेंवर जोरदार टीका, ‘वाचाळवीरांची…’

पोलीस ठाण्यात पोस्टिंगही मिळाली. ललित यांनी पुढे सांगितले की, ‘यानंतर माझी मैत्री माझ्या पत्नीशी झाली. आम्हा दोघांना लग्न करायचे होते, पण तिचे कुटुंबीय तयार नव्हते. पण अखेर आमचं लग्न झालं. ज्या मुलीने सर्व विरोधाला न जुमानता माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता, तिला आई व्हायचं होतं.’

Beed News Police Constable Lalit Kumar Who Lived 20 years as a Women After gender Changed he become Father

हे वाचलं का?

    follow whatsapp