Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यातील ‘ती’ कंपनी शिंदेंच्या नेत्याची! वाचा Inside Story
bmc khichdi scam Latest news in marathi : मुंबई पोलिसांनी ज्या फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, तिचे भागीदार संजय मुशीलकर यांचे पुत्र आहेत. पण, एफआयआरमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेखच केलेला नाही.
ADVERTISEMENT

BMC Khichdi Scam Marathi : बृहन्मुंबई महापालिकेने कोविड लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांसाठी खिचडी वाटप योजना सुरू केली होती. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, माहिती अधिकार कायद्यातून स्फोटक माहिती समोर आली आहे. दि इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वर्तमानपत्रात याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. बीएमसीच्या खिचडी घोटाळ्यात ज्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे, ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याची आहे.
मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटप योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या कथित आरोपांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, माहिती अधिकार कायद्यातंर्गत मागितलेल्या माहितीमुळे खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ज्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ती शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याच्या मालकीची आहे.
खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे शिंदेंच्या नेत्यापर्यंत?
माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या कंपनीचे नाव फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस (force on multi services) असून, एफआयआरमध्ये कंपनीच्या भागीदारांचे नावांचा कोणताही उल्लेख नाही. 8.64 कोटी रुपयांच्या या खिचडी घोटाळ्यातील ही कंपनी शिंदे गटाचे सरचिटणीस संजय मशीलकर यांची आहे. मशीलकर यांचे दोन्ही पुत्र प्रीतम आणि प्रांजल हे त्या कंपनीचे भागीदार आहेत.
मुंबई पोलिसांच्या FIR मध्ये काय?
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे अनोळखी भागीदार आणि कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि ठाकरे गटातील सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.