‘तुम्हाला पळ काढता येणार नाही’, मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला झापलं
Nanded Hospital News in Marathi : नांदेड आणि राज्यातील इतर शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला झापले.
ADVERTISEMENT

Bombay high court on patients death in Nanded hospital : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारचे कान पिळले. रुग्णालयाती सेवा-सुविधा आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने सरकारला झापलं. (Bombay HC recites to Maharashtra government over several deaths in Nanded hospital)
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. औषध तुटवडा आणि वेळीच उपचार न मिळाले, हे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या मृत्यू प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. उच्च न्यायालयाने स्यू मोटू याचिका दाखल करून घेत सरकारला याबद्दल सरकारला विचारणा केली होती.
हेही वाचा >> NCP : शरद पवारांचा ‘तो’ मोठा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला, म्हणाले…
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्याच्या महाधिवक्त्यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. सुनावणी वेळी मुख्य न्यायमूर्तींनी शिंदे सरकारला सवालही केले.
Patients Death in Nanded Hospital : शिंदे सरकारने न्यायालयात काय सांगितलं?
राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितलं की, “नांदेडमध्ये जी परिस्थिती उद्भवली, त्यासाठी कुणा एकाला जबाबदार धरता येणार नाही. सरकारी रुग्णालयांवर सध्या फार ताण आहे, हे नाकारता येणार नाही. योग्य नियोजन हाच यावरचा उपाय ठरू शकतो. पण, हे बदल रातोरात होणार नाहीत”, असे ते म्हणाले.