Video : जीममध्ये ट्रेडमिलवर चालताना अचानक खाली कोसळला, नंतर…काळजाचा थरकाप उडवणारी घटना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

boy dies heart attack on gym video viral khoda ghaziabad uttar pradesh story
boy dies heart attack on gym video viral khoda ghaziabad uttar pradesh story
social share
google news

Gym Heart Attack : देशात गेल्या काही महिन्यांपासून हार्ट अटॅकच्या (Heart Attack) घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. या घटनांमध्ये सर्वाधिक हार्ट अटॅकचे प्रमाण तिशीतल्या तरूणांमध्ये आढळत आहे. त्यामुळे ही चिंताजनक बाब आहे. असे असतानाच आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रेडमिलवर चालता चालता एका तरूणाला हार्ट अटॅक आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृत तरूणाचे नाव सिद्धार्थ आहे. ही घटना उत्तरप्रदेशच्या(Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad) घडली आहे. (boy dies heart attack on gym video viral khoda ghaziabad uttar pradesh story)

ADVERTISEMENT

खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती विहार परिसरातील वॉर्ड नंबर 26 मध्ये सिद्धार्थ त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. घटनेच्या दिवशी सकाळी 12 वाजताच्या सुमारास सिद्धार्थ जीममध्ये व्यायाम करायला गेला होता. यावेळी ट्रेडमिलवर चालता चालता तो अचानक जमिनीवर कोसळला. यावेळी जिममधल्या इतर तरूणांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हे ही वाचा : NCP Crisis : ‘…मग आम्ही कोण?’ छगन भुजबळांनी केली शरद पवारांची कोंडी, थेटच बोलले

मृत सिद्धार्थ हा नोएडा येथील महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता. तसेच तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घटनेच्या 20 मिनिटे आधीच सिद्धार्थने त्याच्या आईशी फोनवर बातचीत केली होती. त्यानंतर पुन्हा तो जीममध्ये गेला होता. यावेळी ट्रेडमिलवर चालताना तो अचानक जमीनीवर कोसळतो, त्यानंतर घटनास्थळी उपस्थित काही तरुण त्याच्याकडे जातात. आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, सर्व प्रयत्न करूनही सिद्धार्थला वाचवण्यात यश येत नाही.

हे वाचलं का?

दरम्यान जीममधील तरूण सिद्धार्थला रूग्णालयात दाखल करतात. यावेळी डॉक्टरां हार्टअटॅकने सिद्धार्थचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या घटनेने सिद्धार्थच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यासोबत परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीत निघालं ‘आदित्य’ नाव, CM एकनाथ शिंदे म्हणाले…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT