Lasya Nanditha : भरधाव कार डिव्हायडरवर धडकली, आमदार नंदिता यांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

आमदार लस्या नंदिता यांचा कार अपघातात मृ
BRS woman MLA Lasya Nandita dies in Car accident
social share
google news

lasya nanditha accident : सिकंदराबाद कँटमधील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार नंदिता त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होत्या. संगारेड्डीतील अमीनपूर मंडल भागातील सुलतानपूर आऊटर रिंग रोड (ओआरआर) वर त्याच्या कारचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन धडकली.

या अपघातात आमदार लस्या नंदिता गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा कार चालकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केसीआर यांनी व्यक्त केला शोक

बीआरएस प्रमुख केसीआर यांनी आमदार लस्या नंदिताच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'तरुण आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने मला दु:ख झाले आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नंदिताच्या निधनाचा मला धक्का बसला: मुख्यमंत्री

तरुण आमदाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना तेलंगणाच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील, सयन्नांशी माझे जवळचे नाते होते. मागच्या वर्षी याच महिन्यात त्याचं निधन झालं… त्याच महिन्यात नंदिताचाही अचानक मृत्यू झाला हे खूप दु:खद आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो...त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.'

केटीआर यांनी व्यक्त केल्या भावना

तरुण महिला आमदाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना केटीआर यांनी एक्स (ट्विटर) वर लिहिले, 'लस्या नंदितांच्या निधनाची दुःखद आणि धक्कादायक बातमी कळली. तरुण आमदाराच्या निधनाने मला धक्का बसला आहे आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांप्रती मी शोक व्यक्त करतो.'

ADVERTISEMENT

कोण होत्या लास्या नंदिता?

लस्या नंदिता या तेलंगणाच्या प्रमुख नेत्या जी, सयन्ना यांच्या कन्या होत्या. 37 वर्षीय लस्या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून पहिल्यांदाच सिकंदराबाद कँट मतदारसंघातून आमदार बनल्या. त्यांचे वडीलही याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT