BMC : शाखा तोडली, शिवसैनिक चिडले.. पण आता अनिल परब का अडकले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

The Mumbai Police have registered a case against Shiv Sena UBT leader Anil Parab and five supporters. Shiv Sena (UBT) leader Anil Parab has been accused of beating up a government employee along with other accused.
The Mumbai Police have registered a case against Shiv Sena UBT leader Anil Parab and five supporters. Shiv Sena (UBT) leader Anil Parab has been accused of beating up a government employee along with other accused.
social share
google news

Latest update on Maharashtra Politics: मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे (Shiv Sena UBT) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यासह पाच समर्थकांवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना (UBT) नेते अनिल परब यांनी अन्य आरोपींसह सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, ही मारहाण नेमकी का करण्यात आली याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (case registered shiv sena ubt anil parab assaulting mumbai municipal corporation official bmc mumbai police)

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

वाकोला पोलिसांनी सांगितले की, अनिल परब आणि इतर शिवसेना नेत्यांनी सोमवारी (26 जून) मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व प्रभागात मोर्चा काढला होता. वास्तविक, गेल्या आठवड्यात कारवाई करताना मुंबई महानगरपालिकेने मुंबई उपनगरातील वांद्रेमधील (Bandra) शिवसेना (UBT) शाखेचा बेकायदेशीर भाग पाडला होता. याच कारवाईच्या निषेधार्थ अनिल परब आणि इतर शिवसेना नेते महापालिका कार्यालयात पोहोचले होते. शिवसेना शाखा (Shiv Sena Shakha) तोडण्याचे आदेश दिलेल्या स्वप्ना क्षीरसागर या अधिकाऱ्याला बोलावण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा >> चक्क एकाच महिन्यात दोनदा प्रेग्नंट झाली महिला, ‘हे’ नेमकं प्रकरण काय?

बीएमसीच्या इतर अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी कनिष्ठ अभियंता अजय पाटील यांना कार्यालयात आणून मारहाण केली. तसंच याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही अधिकाऱ्याला दिली.

हे वाचलं का?

बीएमसी अधिकाऱ्याला बेदम मारहाणॉ

 

शाखा अनधिकृत असल्याचं म्हणत तिचं पाडकाम मुंबई महापालिकेकडून सुरू करण्यात आलेलं. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असलेली कमान हटविण्यास विरोध केला होता. मात्र, तरीही मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यावर हातोडा मारण्यात आला आणि बाळासाहेबांचे फोटो असलेली कमान हटविण्यात आली. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी देखील जाहीर भाषणातून शिंदे-फडणवीसांवर टीका केली होती. याचनंतर मुंबई महापालिकेच्या कार्यालयात शिवसैनिक घुसले आणि त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली.

ADVERTISEMENT

अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल

आता बीएमसी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिल परब आणि अन्य शिवसेना नेते संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शिवसेना नेत्यांविरुद्ध भादंवि कलम 353 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> PUNE: बॅगेतून कोयता काढला, तरुणीवर सपासप वार करत सुटला; सदाशिव पेठ हादरली!

याप्रकरणी आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे वक्तव्य समोर आले आहे. संजय राऊत यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या कृतीला योग्य ठरवत गरज पडल्यास तुरुंगात जाण्याचीही तयारी असल्याचे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT