CBSE बोर्डाचा निकाल तर मे महिन्यात; पण नक्की कधी? जाणून घ्या, निकालाच्या तारखेचे अपडेट्स
CBSE Board Result: सध्या, बोर्डाची परीक्षा देणारे सर्वच विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. तसेच, CBSE बोर्डाच्या परीक्षेचे निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, नेमका कधी लागणार?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
CBSE बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार?
CBSE बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कुठे पाहता येईल?
CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाची मोठी अपडेट
CBSE Board Result 2025: CBSC बोर्डाच्या परीक्षार्थींना त्यांच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाची अगदी आतूरतेने वाट पाहत आहेत. लवकरच CBSE बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. हा निकाल मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याची शक्यत वर्तवली जात आहे. मात्र, निकालाच्या नेमक्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप केली नाही.
यावर्षी सुद्धा CBSE बोर्डाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. तसेच, इंटरमीडिएट बोर्डाच्या परीक्षेचं आयोजन 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल 2024 पर्यंत केलं गेलं होतं. लवकरच, निकालाच्या तारखेची माहिती अधिकृत वेबसाइटवर येईल.
कधी येऊ शकतो निकाल?
मीडिया रिपोर्टनुसार, मागील वर्षांच्या ट्रेंड्सकडे पाहता CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी इयत्तेचा निकाल हा मे महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. तसेच काही सूत्रांच्या मते, बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 15 मे या कालावधी पर्यंत लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, बोर्डाच्या सर्व परीक्षार्थींनी निकालाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष देणं गरजेचं आहे.
हे ही वाचा: ICSE च्या 10 वी आणि ISC च्या 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'इथे' पाहता येईल Result










